स्मार्ट सिटीत धावणार ग्रीन बसेस! ...जोड आहे...
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
ऑपरेटरची लवकरच नियुक्ती : पहिल्या टप्प्यात ५५ बसेस प्रस्तावित
स्मार्ट सिटीत धावणार ग्रीन बसेस! ...जोड आहे...
ऑपरेटरची लवकरच नियुक्ती : पहिल्या टप्प्यात ५५ बसेस प्रस्तावित नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील परिवहन यंत्रणा अद्ययावत के ली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करून शहरात प्रदूषणविरहित बसेस (ग्रीन बस) चालविण्याचा प्रस्ताव असून, पहिल्या टप्प्यात शहरात लवकरच ५५ ग्रीन बसेस धावणार आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या व भविष्यातील गरज विचारात घेता १२०० नवीन ग्रीन बसेसचा प्रस्ताव आहे. यातील पहिल्या टप्प्यात ५५ बसेस लवकरच शहरातील प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.२००७ मध्ये शहर बस संचालनाची जाबदारी मे. वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लि. यांच्यावर सोपविण्यात आली. यात बस ऑपरेटरच्या २३० बसेस तसेच केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मनपाला मिळालेल्या २४० बसेसचा समावेश आहे. परंतु खासगी ऑपरेटरतर्फे सुरू असलेली शहर बससेवा समाधानकारक नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. तसेच रॉयल्टी व शासकीय शुल्क अशा थकीत रकमेचा भरणा त्यांच्याकडून होत नसल्याने शहरातील बस वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. शहर बस वाहतुकीत सुधारणा व आगामी मेट्रो रेल्वे प्रकल्प विचारात घेता फिडर सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने मनपाच्या परिवहन समितीच्या नियंत्रणाखाली नवीन बस ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन ऑपरटेरकडे ५५ ग्रीन बसेस व सध्या शहरात धावत असलेल्या २४० बसेसची जबाबदारी सोपविली जाणार आहे. नवीन ऑपरेटरला स्वत:च्या मालकीच्या नवीन डिझेल बसेस आणाव्या लागतील. भविष्यात या बसेस अल्टरनेट फ्युएलद्वारे संचालित कराव्या लागतील. नवीन बसेसचे भाडे निश्चित करण्याचे अधिकार परिवहन समितीकडे राहणार आहे. (प्रतिनिधी)