शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गे्रट भेट - उद्यम नगरी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

पूजा दामले .................कल्पकतेच्या बळावर पारंपरिक गोष्टींमध्येही अभिनव प्रयोग करता येतात आणि अशाच वस्तू सण-समारंभांत लक्ष वेधून घेतात. लग्नकार्यात भेट म्हणून पैसे पाकिटात घालून दिले जातात. अनेक प्रकारची, रंगांची पाकीटे बाजारात उपलब्ध असतात. पण आपलं पाकिट हे आणखी १०० पाकिटांपैकीच एक असतं. त्यामुळे पैसे काढून घेतले की पाकीट केराच्या टोपलीत ...


पूजा दामले
.................
कल्पकतेच्या बळावर पारंपरिक गोष्टींमध्येही अभिनव प्रयोग करता येतात आणि अशाच वस्तू सण-समारंभांत लक्ष वेधून घेतात. लग्नकार्यात भेट म्हणून पैसे पाकिटात घालून दिले जातात. अनेक प्रकारची, रंगांची पाकीटे बाजारात उपलब्ध असतात. पण आपलं पाकिट हे आणखी १०० पाकिटांपैकीच एक असतं. त्यामुळे पैसे काढून घेतले की पाकीट केराच्या टोपलीत जाते. ही आठवण जपून ठेवली जावी म्हणून अंधेरीच्या मकरंद करंदीकर यांनी पाकिटांनाच एक वेगळा लूक दिला. त्यांनी तयार केलेली अशी पाकीटे अनेकांनी आजही जपून ठेवली आहेत.
...
मकरंद यांच्याकडे प्रत्येक प्रसंगानुसार वेगवेगळी पाकिटे उपलब्ध आहेत. म्हणजे लग्नासाठी लाल रंगाचे जाड कागदाचे पाकीट तयार केले जाते. त्यावर मुंडावळ्या आणि हळदी - कुंकू लावले जाते. आणखी एक प्रकार म्हणजे फेटा तयार करून अथवा रेडीमेड छोटा फेटा आणून पाकीटावर चिकटवला जातो. लग्नात वधू- वरांच्या आयुष्याची गाठ बांधली जाते. त्यामुळेच त्यांना शुभार्शिवाद देताना पाकीटवर शेला - शालूची गाठ असलेली सजावट केली जाते. देवांसाठी बाजारात मिळणार्‍या वस्त्रांपासून अथवा भरजरी जुन्या साड्यांपासून हे शालू आणि शेले तयार केले जातात.
मुंजीसाठीच्या पाकीटाला जानवे लावले जाते. यू आकाराचा टिळा काढतात. उत्तम यश संपादन केल्यानिमित्त भेट द्यायची असले तर पाकीट वेगळ्या पद्धतीने सजवले जाते. यावेळी पाकीटाच्या एका बाजूला मोरपिस लावून त्याच्या बाजूला १ आकड्याची सरस्वती काढली जाते. किंवा एखाद्या पाकीटाला पाटीचा आकार दिला जातो, आणि त्यावर संदेश लिहून दिला जातो. पत्त्यातला एक्का तयार करून असेच यश संपादन करत रहा, अशाही शुभेच्छा दिल्या जातात.
नारळापासूनही उत्तम भेटवस्तू तयार करता येते. नारळ हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते. नारळाचे दोन समान भाग होतील असा तो फोडून घेतला जातो अथवा छोट्या करवतीने कापून घेतला जातो. खोबरे काढून स्वच्छ केला केला जातो. नारळाची शेंडी ठेवून इतर नारळाचा भाग वरून स्वच्छ तासून घेतला जातो. दागिन्याच्या डब्याची कडी नारळाला चिकटवली जाते. सोनेरी रंग दिला जातो अथवा स्प्रे केला जातो. यानंतर त्याला मणी, खडे चिकटवून सजवले जाते. शेंडीला मोत्यांच्या माळा जोडल्यास नारळ आणखीनच आर्कषक दिसतो. काहीवेळा पैसे घेणारच नसतील आणि गृहप्रवेश किंवा तसाच कोणता सोहळा असेल, तर त्यांना छोटी पालखी तयार करून दिली जाते. काहीवेळा पुस्तक तयार केले जाते. आतमध्ये त्या व्यक्तीचे फोटो किंवा आठवणी लिहील्या जातात. अशा अनेक आठवणीत राहणार्‍या युनिक भेटवस्तू बनवल्या जातात. या व्यवसायामुळे अनेकांना काम मिळाले आहे.