शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ेसाकोरा येथे ग्रामसभा संपन्न

By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST

साकोरा : येथे दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त होणारी ग्रामसभा रद्द करण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर नवनिनार्चित सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पहिल्याच ग्रामसभेत विविध नवीन ठराव मंजूर करण्यात आले आहे. साकोरा येथे सरपंच वैशाली झोडगे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या ग्रामभेला उपसरपंच अतूल पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

साकोरा : येथे दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त होणारी ग्रामसभा रद्द करण्यात आल्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर नवनिनार्चित सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पहिल्याच ग्रामसभेत विविध नवीन ठराव मंजूर करण्यात आले आहे. साकोरा येथे सरपंच वैशाली झोडगे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या ग्रामभेला उपसरपंच अतूल पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामसेवक एच. पी. दराडे यांनी अहवाल वाचून दाखलल्यानंतर मागील प्रोसिडिंग मंजूर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासन २०१५ च्या राजपत्रानुसार कर व फी (सुधारणा) आकारणी करण्याबाबतच्या प्रस्तावाचे वाचन झाल्यानंतर ग्रामस्थांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करत जून्याच पद्धतीने कर आकारणी करण्याची मागणी केली. ग्रामस्थांकडून गावात दारू बंदीसह विविध मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यासंबधी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यात येथील जाणता राजा मित्र मंडळाने केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी जागेची मागणी सर्वानुमते मजूर करण्यात आली असून यासंबधीच्या ठरावालाही ग्रामसभेने मजूरी दिली आहे. दरम्यान, एका माजी सदस्याने ग्रामपंचयतीच्या कर थकबाकीचा मुद्दा उपस्थित करत गावचा विकास खुंटल्याचे सांगितले. त्यावर करवसूली साठी विषेश मोहीम राबविण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तात नळपुरवठा खंडीत करण्याबाबत ठरावही मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी नवनिवार्चित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी रखडलेल्या योजना पूर्ण करण्याची मागणी करत गावातील सर्व मंदिरांच्या आवार स्वच्छतेविषयी उपाय योजना करावी,नवीन रस्ते व वीजेची व्यवस्था करावी, गावात नवीन शौचायांची बांधणी, व्यायामशाळा, बंधार्‍यातील साफसफाई,स्मशानभूमीचा रस्ता यासह ग्रामपंचायतीशी निगडीच विविध विकास कामांवर यावेळी चर्चा झाली (वार्ताहर)