शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार?

By admin | Updated: August 2, 2016 23:46 IST

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

नशिराबाद : मुख्यत: पाणी, रस्त्यांसह मूलभूत समस्या सोडविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आठ दिवसात समस्यांवर मात न झाल्यास निष्काळजी व ढिम्मपणाबाबत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकावे? असा निर्धार स्मार्ट व्हिलेज समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
माजी खासदार वाय.जी.महाजन अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतीला गावातील समस्यांबाबत महिनाभरापूर्वी निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र प्रमुख समस्या कायमच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रस्त्यांची डागडुजी केली की थ˜ा मस्करी मांडली असल्याचे सांगून गावातील विविध समस्यांबाबत उहापोह झाला. पावसाळ्यात आठवडा उलटूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनाबाबत ताशेरे ओढले.
समितीच्या कार्याला राजकारणाचा रंग चढत असून दिशा भरकटत असल्याचा आक्षेप प्रा.अरुण पाटील यांनी घेतला. बैठकीला स्मार्ट समितीचे सदस्यच उदासीन आहे. त्यांची उपस्थिती नसल्याबाबतही त्यांनी उहापोह केला.
ग्रामविकास व्हावा हीच माझी तळमळ आहे. सत्ताधार्‍यांनी खुर्चीची लाज ठेवा. नीतीमत्ता शाबूत ठेवा. जनतेचे कामे करा, कुणावर आरोप करावा हा माझा हेतू नाही; पण नियोजन करा. ग्रामविकास साधा, एकत्र या असे आवाहन माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी केले.
बैठकीला स्मार्ट समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, दगडू माळी, बंडू रत्नपारखे, बी.आर.खंडारे, रत्नाकर पांढारकर, शे.रियाज, प्रा.अरुण पाटील, पंकज तारकस, उदय चौधरी, बापू चौधरी, बबन वाणी, संजय पाटील, किशोर पिंगळे आदी उपस्थित होते.