ग्रामपंचायत निवडणुकीची अनुसूची आज होणार जाहीर
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
अकोला: जिल्ह्यात २३७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचनेनुसार अनुसूची १४ फेबु्रवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची अनुसूची आज होणार जाहीर
अकोला: जिल्ह्यात २३७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचनेनुसार अनुसूची १४ फेबु्रवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण ५३९ ग्रामपंचायती असून, त्यापैकी २३७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पूर्वी प्रभागनिहाय अनुसूची तयार करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. सदर काम शनिवारी पूर्ण होणार असून, सात तालुक्यातील तहसीलदार ही यादी शनिवारी प्रसिद्ध करणार आहेत. या यादीनुसार आरक्षण करण्यात येणार असल्यामुळे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.