शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी धमकी दिली, ममतांचा आरोप

By admin | Updated: July 5, 2017 01:22 IST

राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी मंगळवारी फोनवर अत्यंत उद्धटपणे बोलून आपला घोर अपमान केला व आपल्याला धमकीही दिली, असा

कोलकाता : राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी मंगळवारी फोनवर अत्यंत उद्धटपणे बोलून आपला घोर अपमान केला व आपल्याला धमकीही दिली, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.एका इंग्रजी वृत्तवाहिनीने व वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी असेही म्हणाल्या की, भाजपाच्या एखाद्या ब्लॉक अध्यक्षाने बोलावे अशा भाषेत बोलून राज्यपालांनी आपला आणि पर्यायाने जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांचा उपमर्द केला.त्या म्हणाल्या, संपूर्ण आयुष्यात अशा पद्धतीने कोणी मला अपमानीत केले नव्हते... राज्यपाल ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले ते ऐकून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असा विचारही माझ्या मनात आला. राज्यपालांच्या अशा पद्धतीने बोलण्यावर आपण तीव्र नाराजी व्यक्त केली व त्रिपाठी यांनाही कडक भाषेत खडसावले, असे सांगून ममता बॅनजी म्हणाल्या : मी तुमच्या मेहेरबानीने मुख्यमंत्री झालेले नाही, मला लोकांनी सत्तेवर निवडून दिले आहे. त्यामुळे आपण घटनात्मक पदावर असलात तरी लोकनियुक्त मुख्यमंत्र्याशी अशा भाषेत बोलू शकत नाही, असे आपण राज्यपालांना ऐकविले.याआधीही वादयाआधी लष्कराने कोलकाता शहरात व खास करून सचिवालयाजवळ ध्वजसंचलन करण्यावरून मुख्यमंत्री बॅनर्जी व राज्यपाल त्रिपाठी यांच्यात जाहीर शाब्दिक चकमक घडली होती. राज्यपालांकडून इन्कारकोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखली जायला हवी, असे आपण मुख्यमंत्री बॅनर्जी यांना जरूर सांगितले. पण धमकी देऊन त्यांचा अपमान केला, हे मात्र अजिबात खरे नाही, असा खुलासा राज्यपाल त्रिपाठी यांनी केला. त्रिपाठी म्हणतात की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पवित्रा व वापरलेल्या भाषेचे मला आश्चर्य वाटते. अशा प्रकारचे संभाषण गोपनीय स्वरूपाचे असते व त्याची वाच्यता कोणीही करू नये, अशी अपेक्षा असते. ज्याने मुख्यमंत्र्यांना धमकावल्यासारखे किंवा अपमान केल्यासारखे वाटावे, असे त्या संभाषणात मी काहीच बोललो नाही.