शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विधानाने देशाची प्रतिमा मलिन

By admin | Updated: May 7, 2015 01:31 IST

दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला.

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा माहीत नाही, हे सरकारने लोकसभेत दिलेले स्पष्टीकरण नव्या राजकीय संघर्षाचे कारण ठरले आहे. काँग्रेसने बुधवारी या निमित्ताने राज्यसभेत सरकारवर जोरदार तोफ डागली. दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगून मोदी सरकारने देशाची प्रतिमा मलिन केली, असा आरोप काँग्रेसने केला. अन्य विरोधी पक्षांनीही यास दुजोरा देत, यासंदर्भात स्पष्टीकरणाची मागणी केली.राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उचलून धरला. दाऊद पाकिस्तानात दडून बसला आहे, यावर आधीचे सरकार कायम राहिले. गत २०-२२ वर्षांत मग ते अटल बिहारी वाजपेयी सरकार असो वा कॉंग्रेस सरकार असो. दाऊद पाकिस्तानात असल्याचे या सरकारांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून ठणकावून सांगितले आहे. असे असतानाच, दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सरकारने सांगणे हे दु:खद आहे. यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे, असे आझाद म्हणाले. माकपाचे सीताराम येचुरी यांनीही आझाद यांना दुजोरा दिला आणि गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सभागृहाची भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. दाऊद भारताचा गुन्हेगार आहे. तो पाकिस्तानात आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)गृहमंत्र्यांच्या माहितीत तफावत> मंगळवारी लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरादाखल गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी दाऊदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले होते. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. > तो कुठे आहे हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले होते. भारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. > दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती> त्याच दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता.