शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सरकारच्या ‘गोल्ड स्किम्स’ना जनतेकडून थंड प्रतिसाद!

By admin | Updated: May 17, 2017 01:45 IST

सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजना सामान्य जनतेला आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याचे मत एका अध्ययनातून पुढे आले आहे.

अहमदाबाद : सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजना सामान्य जनतेला आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याचे मत एका अध्ययनातून पुढे आले आहे. या योजनांबाबत लोकांमध्ये अधिक माहिती नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. इन्स्टिट्यूट फॉर फायनान्सियल मॅनेजमेंट अँड रिसर्चने (आयएफएमआर) हे अध्ययन केले आहे. यासाठी इंडियन गोल्ड पॉलिसी सेंटरने (आयजीपीसी)अर्थसाह्य केले आहे. आयजीपीसीचे प्रमुख प्रोफेसर अरविंद सहाय यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कोल्हापूर, तामिळनाडूतील कोईम्बतूर, पश्चिम बंगालमधील हुगळी आणि उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये एक हजार लोकांशी संपर्क करून हे अध्ययन करण्यात आले आहे. या अध्ययनातून जे निष्कर्ष समोर आले आहेत ते चकित करणारे आहेत. या चार जिल्ह्यांतील ज्या एक हजार लोकांशी चर्चा करण्यात आली त्यातील फक्त पाच जणांना सरकारच्या गोल्ड स्किमबद्दल माहिती होती. गोल्ड मोनेटायझेशन, गोल्ड बाँड आणि गोल्ड कॉईन स्किम या त्या योजना आहेत. या अध्ययनातील एक संशोधक मिसा शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला असे दिसून आले की, या योजनांबाबत लोकांना खूपच कमी माहिती होती. दोन वर्षांपूर्वी सरकारने या योजना सुरू केल्या आहेत. अरविंद सहाय म्हणाले की, देशातील नागरिकांकडे १५ हजार टन सोने आहे. जर लोकांना योग्य माहिती मिळाली तर ते या योजनेत गुंतवणूक करण्यास तयार आहेत. यातील अनेक लोकांनी तर असे सांगितले की, त्यांनी व्यापार, शिक्षण आणि घर दुरुस्तीसाठी गोल्ड लोन घेतलेले आहे. मार्केटिंगचे प्रयत्न म्हणून बँकांनाही गोल्ड लोन देण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. असे कर्ज घेण्यासाठी त्यांनी लोकांची मानसिकता तयार करायला हवी. (वृत्तसंस्था)गोल्ड बाँड स्किम; दरानुसार सरकारकडून देण्यात येते व्याजया योजनेंतर्गत ५, १०, ५०, १०० ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करता येतात. एक व्यक्ती ५०० ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करु शकतो. त्याबदल्यात सोन्याच्या दरानुसार सरकारकडून व्याज देण्यात येते. बँक आणि पोस्ट आॅफिसमधून हे बाँड देण्यात आले. या योजनेची मुदत ५ ते ८ वर्षे आहे.गोल्ड मोनेटायझेशन स्किम जर आपल्याकडे अधिक सोने असेल तर ते बँकेत ठेवता येईल. या योजनेनुसार, एफडीवर मिळणाऱ्या व्याजासारखेच हे व्याज मिळेल. यावर कोणताही कर लागणार नाही. लघु, मध्यम आणि दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच १ ते १५ वर्षांसाठी या योजना आहेत.गोल्ड कॉइन स्किम पाच आणि दहा ग्रॅमच्या सोन्याची विक्री या योजनेंतर्गत करण्यात आली. बँक आणि पोस्ट आॅफिसमधून हे नाणे देण्यात आले. कोट्यवधी रुपयांचे सोने बँकींग प्रणालीत आणण्याचा यामागचा उद्देश आहे.