शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न

By admin | Updated: July 4, 2015 00:05 IST

- खा. अशोक चव्हाणांचा आरोप

- खा. अशोक चव्हाणांचा आरोप
मुंबई : मदरशातील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरविण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा तीव्र विरोध असून सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याक समाजात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारचा हा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या धोरणाला छेद देणारा आहे. मुस्लीम समाजातील केवळ ४ टक्के मुले मदरशात शिक्षण घेत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शिवाय येथील शिक्षणही दर्जेदार असते. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.
कर्जमाफी न मिळाल्याने गेल्या सहा महिन्यांत राज्यात १०५९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे येत्या ९ व १० जुलै रोजी संपूर्ण राज्यात मोर्चे, निदशर्ने, धरणे आदींच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतरही सरकारने कजर्माफी न दिल्यास विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला.
कजर्मुक्ती आंदोलनाची जिल्हानिहाय जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे व सातारा जिल्ह्यातील आंदोलनांचे नेतृत्व करणार असून, नारायण राणे सिंधुदूर्ग व रत्नागिरीतील आंदोलनांची धुरा सांभाळतील. अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन होईल. या व्यतिरिक्त आ. पतंगराव कदम (सांगली व कोल्हापूर), आ.बाळासाहेब थोरात (नाशिक), आ. माणिकराव ठाकरे (वाशिम व अकोला), रोहिदास पाटील (धुळे व जळगाव), खा. राजीव सातव (हिंगोली), आ. विजय वडे˜ीवार (चंद्रपूर), हर्षवर्धन पाटील (सोलापूर), रविशेठ पाटील (रायगड), आ. नसीम खान (ठाणे), आ. डी.पी. सावंत (नांदेड व परभणी), आ. रणजित कांबळे (वर्धा), आ. अब्दुल सत्तार (जालना), आ. अमित देशमुख (लातूर व बीड), आ. मधुकरराव चव्हाण (उस्मानाबाद), आ. गोपालदास अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र गावीत (पालघर), पद्माकर वळवी (नंदूरबार), शिवाजीराव मोघे (बुलडाणा व यवतमाळ), वसंत पुरके (अमरावती), नितीन राऊत (नागपूर व भंडारा), नामदेव उसेंडी (गडचिरोली) आदी नेतेही या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत
----
भाजपा मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मदरशांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची, खळबळ माजविण्याची ही भाजपाची जुनी नीती
- खा. अशोक चव्हाण