शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोट्यातील उपक्रमांची सरकार विक्री करणार

By admin | Updated: April 25, 2016 03:58 IST

सरकारी खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने सरकार तोट्यातील काही उपक्रमांच्या विक्रीचा विचार करीत आहे.

नवी दिल्ली : सरकारी खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने सरकार तोट्यातील काही उपक्रमांच्या विक्रीचा विचार करीत आहे. या काळात या उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण केले जाईल आणि त्यांना ‘आकर्षक’ भरपाई देण्याचा प्रस्ताव दिला जाईल. सूत्रांनी सांगितले की, खर्च व्यवस्थापन आयोगाच्या शिफारशीनुसार काही तोट्यातील सरकारी उपक्रमांच्या विक्रीचा विचार केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताला नुकसान होणार नाही या दृष्टीने हे काम केले जाईल. सरकार आणि कर्मचारी या दोघांनाही फायदा व्हावा या दृष्टीने हे काम केले जाणार आहे. तोट्यातील उपक्रमांची यादी सरकारने अगोदरच तयार केली असून या उपक्रमातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची रक्कम एकदाच देण्याची पेशकश केली जाऊ शकते. सरकारच्या ताज्या अहवालानुसार गेल्या वर्षी मार्च अखेरीसपर्यंत ७७ तोट्यातील उपक्रम होते. या सर्व उपक्रमांचा तोटा २७,३६० कोटी रुपये होता. भारत गोल्ड माईन्स, टॅनरी अ‍ॅण्ड फुटवियर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, सायकल कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, मायनिंग अ‍ॅण्ड अलाईड मशिनरी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया, भारत प्रोसेस अ‍ॅण्ड मेकॅनिकल इंजिनिअर्स, वेबर्ड इंडिया आणि भारत ब्रेक्स अ‍ॅण्ड व्हॉल्व्हस् आदींचा तोट्यातील उपक्रमात समावेश आहे.>उत्पन्न वाढविण्यावर एअर इंडियाचा भरबाजारातील कठीण परिस्थिती आणि वित्तीय अडचणी असूनही एअर इंडिया ही सरकारी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्याऐवजी उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करीत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.एअर इंडियात जवळपास १९ हजार कर्मचारी असून त्यात १५०० वैमानिक आहेत. ६ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. कंपनीला ३० हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज मिळाले आहे, हे येथे ध्यानात घ्यावे लागेल.हा अधिकारी म्हणाला की, कंपनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करीत आहे. त्यात कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या खर्चात कपात करण्याची कोणतीही योजना नाही.कंपनीच्या एकूण खर्चात कर्मचाऱ्यांवरील खर्चाचा वाटा केवळ १२ टक्के आहे. कर्मचाऱ्यांना दिले जाणारे विविध लाभ, भत्ते रद्द करणे किंवा समाप्त करणे ही खर्चातील कपातीची एक सोपी प्रणाली आहे. तथापि, त्यातून प्रदीर्घ अवधीसाठी काहीही साध्य होत नाही. त्यामुळेच कंपनीने कर्मचाऱ्यांवरील खर्चात कपात करण्याऐवजी उत्पन्न वाढीवर भर दिला आहे.