शासनाने ठरविलेला दर न देणार्या साखर कारखान्यांना ठोकणार टाळे!
By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST
२५०० दर मिळणार; कारखान्यांना नोटिसा
शासनाने ठरविलेला दर न देणार्या साखर कारखान्यांना ठोकणार टाळे!
२५०० दर मिळणार; कारखान्यांना नोटिसाराजेंद्र हजारेनिपाणी : कर्नाटकातील सहकारी आणि खासगी तत्त्वावरील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २५०० रुपये दर देण्याची सूचना सरकारने केली आहे. त्या प्रकारची नोटीस वजा आदेश कारखान्यांना पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. हा दर न देणार्या कारखान्यांना टाळे ठोकण्यात येणार असल्याने कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.राज्यात बेळगाव जिल्हा हा साखरेचा पा म्हणून ओळखला जातो. या भागात सहकारी तत्त्वावर खासगी कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. सहकारी साखर कारखाने चालविण्यात यशस्वी ठरलेल्या साखरसम्राटांनीच खासगी साखर कारखाने निर्माण केले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात फायदा घेत ही मंडळी मोठी बनत चालली आहेत. त्यामुळे सरकारने सर्वच कारखान्यांनी प्रतिटन २५०० रुपये दर देण्याचा आदेश काढला आहे.गत हंगामात सुरुवातीलाच प्रतिटन तीन हजारांच्या उचलीसाठी कर्नाटक-महाराष्ट्रात शेतकर्यांनी आंदोलने केली; पण हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेचे दर कमी झाल्याने कारखानदारांनी या दराला मान्यता दिली नाही. त्यामुळे कारखानदार आणि सरकारची कर्नाटकात बैठक घेऊन कारखानदारांनी प्रतिटन २५०० रुपये, तर राज्य सरकारने प्रतिटन १५० रुपये असे २६५० रुपये दराचा तोडगा काढण्यात आला. तरीही कारखानदारांनी न जुमानता प्रतिटन २००० ते २१०० रुपये दर दिला. यावेळी सरकारने १५० रुपये दर देणार असल्याचे सांगितल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला. चौकटसरकारचे १५० रुपये लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर : प्रकाश हुक्केरी कर्नाटक सरकारने प्रतिटन उसाला १५० रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे आचारसंहिता संपताच ती रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शिवाय कारखानदारांना २५०० रुपये दर देण्यास भाग पाडणार असल्याचे साखरमंत्री प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.फोटो - 12एनपीएन1 - साखर कारखान्याचा लोगो.