शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

यापुढे सरकारी व्यवहार रोख रकमेने बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:21 AM

तुम्ही आतापर्यंत कधीही डिजिटल पेमेंट केले नसेल वा ते कसे करायचे, हे तुम्हाला माहीत नसेल, तर यापुढे ते शिकून घ्यावेच लागेल. याचे कारण म्हणजे रेल्वेच्या तिकिटापासून एसटीच्या तिकिटापर्यंत तुम्हाला डिजिटल पेमेंट करण्याची सक्ती होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत कधीही डिजिटल पेमेंट केले नसेल वा ते कसे करायचे, हे तुम्हाला माहीत नसेल, तर यापुढे ते शिकून घ्यावेच लागेल. याचे कारण म्हणजे रेल्वेच्या तिकिटापासून एसटीच्या तिकिटापर्यंत तुम्हाला डिजिटल पेमेंट करण्याची सक्ती होण्याची शक्यता आहे. अगदी सरकारी पर्यटन महामंडळाच्या बसेस वा हॉटेल, रिसॉर्ट्स येथेही डिजिटल पेमेंट हाच एकमेव पर्याय तुमच्यापुढे असू शकेल.केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केल्यानंतर, सर्वांनाच डिजिटल पेमेंटकडे वळण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी अनेक सरकारी व खासगी अ‍ॅपही आता उपलब्ध आहेत. ते तुम्ही अद्याप डाउनलोड केले नसतील, हे बहुधा लगेचच करून घ्यावे लागतील.सरकारी सेवांसाठी भीम अ‍ॅप व भारत क्यूआर कोडबरोबरच आणखी काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. थोडक्यात म्हणजे, कोणत्याही सरकारी सेवेसाठी रोख रकमेचा वापर होऊ नये आणि सारे सरकारी आर्थिक व्यवहार डिजिटलच असावेत, असे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहे. हे सरकारला आॅक्टोबर, महात्मा गांधी जयंती दिनी जाहीर करायचे असून, त्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी इच्छा आहे.एकीकडून रेल्वे, बस तिकिटे, नोंदणीशुल्क, स्टॅम्पड्युटी, सरकारकडून कोणतीही खरेदी या साºयांचे जसे डिजिटल पेमेंट करावे लागेल, तसेच सरकारही सर्वांची देणी याच प्रकारे संबंधितांच्या खात्यात जमा करेल. त्यासाठी धनादेशाचाही वापर होऊ नये, असे सरकारला वाटत आहे. रेल्वे दरवर्षी तब्बल ५२ हजार कोटी रुपयांच्या तिकिटांची विक्री करते. त्यापैकी ६० टक्के रक्कम आजही आॅनलाइन जमा होत असते. ती १00 टक्क्यांपर्यंत जावी, असा प्रयत्न आहे.