शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा सरकार ८६ लाख साड्या वाटप करणार

By admin | Updated: May 9, 2017 00:38 IST

विविध कल्याणकारी योजनांनंतर तेलंगणातील के. चंद्रशेखर राव सरकार आता आणखी एक योजना सुरू करणार आहे.

हैदराबाद : विविध कल्याणकारी योजनांनंतर तेलंगणातील के. चंद्रशेखर राव सरकार आता आणखी एक योजना सुरू करणार आहे. या योजनेतून तेलंगणातील भुकेकंगाल विणकारांना रोजगार तर मिळणार आहेच, तद्वतच मोठ्या संख्येने महिलांना सरकार आणि पक्षाकडे (तेलंगणा राष्ट्र समिती) आकर्षित करण्यासही मदत होईल. या योजनेतहत राज्य सरकारचा दारिद्र्यरेषेखालील महिलांना ८६ लाख साड्या वाटप करण्याचा बेत आहे. या योजनेचा मुहूर्तही राज्य सरकारने निश्चित केला असून, बतुकम्मा उत्सवादरम्यान साड्या वाटप करणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर साड्या वाटप करणे सुलभ व्हावे म्हणून तेलंगणातील, विशेषत: सिर्सिला येथील हातमाग आणि यंत्रमाग विणकरांकडे साड्यांची मागणी नोंदविली जाणारआहे.साड्या खरेदीसाठी १६० कोटींचा खर्च येईल. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समिती सरकारची ही योजना म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक निवडणूक खेळी होय, अशी टीका होणे स्वाभाविक असले तरी यातून जगण्यासाठी धडपड करणाऱ्या विणकरांच्या हाताला काम मिळणार असून, या कामाचे दामही मिळणार आहे. या साडीचा रंग आणि नक्षीकामही ठरविण्यात आले असून, यावर तेलंगणा आणि राज्यांची संस्कृती प्रतीत करणारे नक्षीकाम असेल. राज्य सरकार लवकरच तेलंगण राज्य हातमाग विणकर सहकारी संस्थेकडे मागणी नोंदविणार आहे.तेलंगण हातमाग विणकर सहकारी संस्थेचे सह-संचालक पी. यादगिरी यांनी समाजकल्याण, आरोग्य, वैद्यकीय आणि पर्यटन विभागाने नोंदविलेल्या मागणीसंदर्भात बोलण्याचे टाळले आहे. (वृत्तसंस्था)केसीआर कीट-याशिवाय केसीआर कीटचा (गृहोपयोगी भेट वस्तूसंच) भाग म्हणून राज्य सरकारने ५ लाख साड्या विणण्याचे कामही दिले असून, यासाठी १२.५ कोटी खर्च येणार आहे. या कीटमध्ये माता आणि बालकांसाठी साबण, तान्ह्या बाळांसाठी अंगमर्दन तेल, बाळांसाठी पथरुणी, मच्छरदाणी, कपडे, साडी, आकर्षक पिशवी, पंचा (टॉवेल), हातरुमाल, पावडर, बाळलंगोट, खेळणी आदींचा यात समावेश असेल. ही योजना प्रत्यक्षात उतरल्यास संसारोपयोगी वस्तूंसह यंदाचा बतकम्मा उत्सव विणकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.