शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

किमान १,००० रुपये मासिक पेन्शन योजनेला सरकारची मंजुरी

By admin | Updated: April 29, 2015 23:26 IST

सरकारने कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) पेन्शनधारकांना किमान १,००० रुपये मासिक पेन्शन देण्याच्या योजनेला बुधवारी कायमस्वरूपी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : सरकारने कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) पेन्शनधारकांना किमान १,००० रुपये मासिक पेन्शन देण्याच्या योजनेला बुधवारी कायमस्वरूपी मंजुरी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील २० लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.सध्या ही पेन्शन योजना गेल्या मार्च २०१५ पर्यंतच लागू होती. आता ही योजना नेहमीसाठी लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कर्मचारी पेन्शन योजना १९९५ अंतर्गत (ईपीएस) किमान १,००० रुपये मासिक पेन्शन योजना २०१४-१५ पासून पुढे चिरकाल जारी ठेवण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही योजना ३१ मार्चनंतर पुढे जारी ठेवण्याबाबत सरकारकडून कोणतेही निर्देश न मिळाल्यामुळे ईपीएफओने १ एप्रिलपासून ही योजना निलंबित केली होती. ही योजना गेल्या सप्टेंबर २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याआधी बहुतांश कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर १,००० पेक्षाही कमी पेन्शन मिळत होती. किमान १,००० रुपये मासिक पेन्शन योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर एक सार्थक जीविका उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. मंत्रिमंडळाने या योजनेसाठी अर्थसंकल्पातून आवश्यक अनुदान जारी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. हे अनुदान वार्षिक ८५० कोटी रुपये असेल आणि हळूहळू त्यात घट होत जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)४नवी दिल्ली : रालोआ सरकारच्या प्रमुख १०० स्मार्ट सिटी प्रकल्प आणि शहर नवीनीकरण मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पांवर किमान एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. ४१०० स्मार्ट शहरांच्या विकासासाठी स्मार्ट सिटीज मिशन आणि ५०० शहरांसाठी शहर रूपांतरण आणि नवीनीकरण अटल मिशनला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांवर अनुक्रमे ४८००० कोटी आणि ५०००० कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. ४दोन नव्या बटालियन्सना मंजुरी देऊन राष्ट्रीय आपदा बचाव दलाची ताकद केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढविली आहे.