शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधार याचिकेला सरकारचा विरोध

By admin | Updated: February 14, 2017 00:36 IST

आधारवरील विधेयकाला वित्त विधेयक म्हणून मान्यता देण्याच्या लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाला ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले

नवी दिल्ली : आधारवरील विधेयकाला वित्त विधेयक म्हणून मान्यता देण्याच्या लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाला ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले असून, त्या याचिकेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी विरोध केला. वित्त विधेयकासाठी आवश्यक असलेल्या बाबी आधार विधेयकामध्ये आहेत, असे महाअधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी याचिकेला विरोध करताना नमूद केले. रमेश यांची बाजू माजी अर्थमंत्री व वरिष्ठ वकील पी. चिदंबरम यांनी मांडली. आधार विधेयकाला वित्त विधेयक करण्यामागे ते राज्यसभेत सादर न करण्याची सरकारची इच्छा होती, असे चिदम्बरम म्हणाले. त्यावर राज्यसभेचा वित्त विधेयकाशी काहीही संबंध नाही. समाज कल्याणासाठी खर्च होणारा सगळा पैसा हा आधारकार्डशी जोडला गेलेला आहे व एकत्रित निधीतून तो काढला जाईल, असे रोहटगी म्हणाले.लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही, असे अ‍ॅड रोहटगी म्हणाले. आधार विधेयकाला वित्त विधेयक म्हणून मान्यता देण्याच्या लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाची छानणी झाली पाहिजे यावर आग्रही असलेले चिदंबरम म्हणाले की वित्त विधेयक म्हणून कशाला म्हटले जाते, हे ठरणे आवश्यक आहे. सरन्यायाधीश जे. एस.खेहार, न्यायमुर्ती एन. व्ही. रामना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याचिकेमध्ये जो मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे तो गंभीर असल्याचे मत खंडपीठाचे आहे. तथापि, मुकुल रोहटगी यांनी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की हा विषय एकत्रित निधीतून पैसे काढण्याशी संबंधित आहे. रोहटगी यांनी उपस्थित केलेल्या सगळ््या मुद्यांचा विचार करा, असे खंडपीठाने सांगून सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली. या विषयावर तातडीने विचार करावा, असे आम्हाला वाटत नसल्याचे खंडपीठाने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)