शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची महागडी जमीन खासगी कंपन्यांना देण्याची सरकारची तयारी, ऑनलाइन लिलावही जाहीर

By बाळकृष्ण परब | Updated: December 12, 2020 07:58 IST

Indian Railway : केंद्र सरकारने रेल्वेच्या मालकीची महागडी जमीन खासगी कंपन्यांना लीजवर देण्याची तयारी पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने रेल्वेच्या मालकीची महागडी जमीन खासगी कंपन्यांना लीजवर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. दिल्लीमधील तीस हजारी मेट्रो आणि काश्मिरी गेजच्या बाजूला असलेल्या रेल्वे कॉलनीमधील महागडी जमीन खासगी कंपन्यांना लीजवर देण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. सरकारने त्यासाठी ऑनलाइन लिलावही जाहीर केले आहे. ऑनलाइन बोली लावण्यासाठीची अखेरची तारीख २७ जानेवारी २०२१ आहे. ही जमीन सुमारे २१ हजार ८०० स्क्वेअर मीटर आहे. ही जमीन मध्य दिल्लीमधील सर्वा मौल्यवान भूखंड मानला जातो. सध्या या जमिनीसाठी ३९३ कोटी एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.या जमिनीवर पीपीपी मॉडेल अंतर्गत पाच वर्षांत कॉलनी तसेच मॉल आणि दुकाने बांधण्यात येणार आहे. रेल्वेकडे रिकामी पडून असलेल्या भूखंडांचा विकास करण्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरण म्हणजेच फं्र’ छंल्ल िऊी५ी’ङ्मस्रेील्ल३ अ४३ँङ्म१्र३८ स्थापन करण्यात आली होती. या माध्यमातून देशभरात ८४ रेल्वे कॉलनी या प्रकारे विकसित करण्याचा विचार आहे. आरएलडीएचे उपाध्यक्ष वेदप्रकाश दुडेजा यांनी सांगितले की, नवी दिल्ली, गोमतीनगर, देहराडूनसह अनेक शहरांमधील रेल्वेची जमीन विकसित करण्याचे काम सुरू आहे.गेल्या महिन्यात रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने वाराणसीमध्ये स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत वसुंधरा लोको रेल्वे कॉलनीच्या पुनर्विकासासाठी ऑनलाइन बोली आयोजित केल्या होत्या. या योजनेंतर्गत एकूण जमीन २.५ हेक्टर एवढी ठेवण्यात आली आहे. यापैकी १.५ हेक्टर जमीन रेल्वे कमर्शियल कॉम्प्लेक्स विकसित करण्याचा विचार आहे. आरएलडीएने या योजनेसाठी लीजचा अवधी ४५ वर्षे एवढा निर्धारित केला आहे. तसेच रिझर्व्ह प्राइज केवळ २४ कोटी एवढी ठेवली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेdelhiदिल्ली