शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नेटवर्क ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षित

By admin | Updated: May 17, 2017 01:43 IST

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’या रॅन्समवेअर व्हायरसपासून सरकारी संगणकप्रणालीचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली असल्याचे

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’या रॅन्समवेअर व्हायरसपासून सरकारी संगणकप्रणालीचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी दिले. रॅन्समवेअर व्हायरसबाबत केंद्र सरकारला मार्चपासूनच हायअलर्ट दिलेला होता. आवश्यक ती सुविधा यापूर्वीच संगणकप्रणाली इंन्स्टॉल केलेली आहे. येथे ब्रॉडबँड इंडिया फोरमच्या उद्घाटन सत्रात बोलताना अरुणा सुंदरराजन म्हणाल्या की, येथील प्रणालीवर या व्हायरसचा परिणाम झाल्याचे कुठलेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, माहितीतंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते की, रॅन्समवेअर व्हायरसचा देशातील प्रभाव शून्य टक्के आहे. आम्ही आमची सायबर सुरक्षा मजबूत करत आहोत. मायक्रोसॉफ्टशी चर्चा केल्यानंतर आम्ही लोकांना मार्चमध्येच‘पॅच सिस्टिम’इन्स्टॉल करण्यास सांगितले होते, असेही प्रसाद यांनी सांगितले.हॅकर्सची उत्तर कोरियाशी लिंक - १५० देशात धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचे सायबर गुन्हेगार शोधण्याची मोहिम सुरु आहे. या हॅकर्सची लिंक उत्तर कोरियाशी असू शकते, असा दावा गुगलसोबत काम करणारे भारतीय वंशाचे सेक्युरिटी रिसर्चर नील मेहता यांनी केला आहे.- उत्तर कोरियासाठी काम करणारा ‘लाजारस ग्रुप’या हल्ल्यामागे असू शकतो. ‘वन्नाक्राय’मध्ये वापरण्यात आलेल्या कोडिंग आणि टूल्सचा उपयोग हा ग्रुप करतो. - २०१४ मध्ये सोनी पिक्चर्सच्या हॅकिंगचे आणि २०१६ मध्ये बांग्लादेशातील एका बँकेत हॅकिंगची घटना घडली होती. त्याला लाजारस ग्रुपच जबाबदार होता. एक अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे की, लाजारस ग्रुप हा कुणाच्याही निर्देशाशिवाय स्वतंत्रपणे काम करत असावा.