शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएसजी’च्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल

By admin | Updated: June 27, 2016 04:17 IST

(एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती.

नवी दिल्ली : अणु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती. या गटाचा सदस्य बनून भारत काही मिळविण्याऐवजी गमावणारच होता. सरकारमध्ये बसलेले लोक याबाबत दररोज दिशाभूल करीत आहेत, असे सांगत माजी विदेशमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.भारताने एनएसजीचे सदस्यत्व स्वीकारू नये हे मी ठामपणे सांगत आहे. आपल्याला जे हवे ते आधीच मिळाले आहे, असे ८३ वर्षीय सिन्हा यांनी स्पष्ट केले. भारताने सदस्यत्व मिळविण्यासाठी खूपच उत्सुकता आणि न मिळाल्यामुळे निराशा दर्शविली. त्याची काहीही आवश्यकता नाही. भारत एनएसजीच्या बाहेरच योग्य आहे. आपण सदस्य बनल्यास नुकसानच जास्त आहे. आपल्याला कोणताही लाभ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) >एनएसजी सदस्यत्वाच्या भारताच्या आशा पल्लवितअण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या भारतासारख्या देशांना प्रवेश देण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी अणु पुरवठादार समूहाचे सदस्य असलेल्या राष्ट्रांची या वर्षाअखेर पुन्हा एक बैठक बोलावली जाणार आहे. त्यामुळे ४८ सदस्यीय एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याबाबतच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तूर्त एनएसजीचे सदस्यत्व मिळाले नसले तरी आम्ही प्रयत्न सुरुच ठेवू. संबंध सुधारायचे असतील तर उभय देशांना परस्परांचे हित, चिंता व अग्रक्रम जपावे लागतील, हे चीनला पटवून देत राहू.- विकास स्वरूपसरकारला मुद्दा समजला काय?सरकारमध्ये बसलेल्या लोकांना हा मुद्दा समजला की नाही ते माहीत नाही, मात्र सरकारमध्ये असे लोक बसले आहेत की ते सरकारची दररोज दिशाभूल करीत आहेत, हे मला माहीत आहे, असेही सिन्हा यांनी नमूद केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत सिन्हा हे विदेशमंत्री राहिले होते. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधासह मोदी सरकारच्या विदेश धोरणासंबंधी विविध मुद्यांवर रोखठोकपणे मते मांडली.