शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नेट न्यूट्रॅलिटीसाठी सरकार वचनबद्ध

By admin | Updated: May 6, 2015 00:42 IST

सर्व नागरिकांना इंटरनेट संपर्काची समान संधी दिली जाईल, भेदभावाला कोणताही वाव नसेल, अशी ग्वाही सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : सर्व नागरिकांना इंटरनेट संपर्काची समान संधी दिली जाईल, भेदभावाला कोणताही वाव नसेल, अशी ग्वाही सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने(ट्राय) सरकारला सादर केलेल्या सल्लामसलत पत्रावर सर्वच विरोधी पक्षांनी राजकीय भेद बाजूला सारत सडकून टीका केली. सर्व नागरिकांना इंटरनेट संपर्काची समान संधी मिळेल. नेट तटस्थतेच्या मूलभूत संकल्पनेशी सरकार कटिबद्ध असेल. सर्वांना इंटरनेट प्रवेशाची तसेच उपलब्धतेची समान संधी प्रदान केली जाईल, असे दूूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंटरनेट तटस्थतेसंबंधी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना केली. पंधरवड्यापूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत नेट तटस्थतेच्या मुद्यावर चर्चा छेडली तेव्हा तणाव निर्माण झाला होता. राज्यसभेत मात्र याउलट मतैक्याचे वातावरण दिसून आले. भाजप आणि शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केलेली एकमुखी चिंता पाहता नेट तटस्थतेच्या मुद्यावर संपूर्ण सभागृह एकमुखाने बोलत असल्याकडे प्रसाद यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मिठाच्या सत्याग्रहाशी केली तुलना> चर्चेत सदस्यांनी सभागृहाला केल्या जात असलेल्या वीज व पाणी पुरवठ्याचा मुद्दा नेट तटस्थतेशी जोडत चर्चा रंगतदार बनविली. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरानुसार किंवा नळ कुठे लागला आहे या आधारावर स्वतंत्र दर आकारले जात नाही, तसेच नेट तटस्थतेचे असावे. > भाजपच्या एका सदस्याने तर नेट तटस्थतेच्या लढ्याची तुलना चक्क महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहाशी केली. दूरसंचार कंपन्यांना त्यांनी ‘शेलॉक’ आणि ‘शार्क’ असे संबोधले.> इंटरनेट स्वातंत्र्यासाठी कोणत्याही सत्याग्रहाची गरज नाही. सरकार नेट स्वातंत्र्यासाठी कटिबद्ध आहे. या विषयाशी निगडित अनेक मुद्यांवर सार्थक निर्णयासाठी सल्लामसलतीची गरज आहे.- रविशंकर प्रसाद, दूरसंचारमंत्री> सल्लामसलत पत्रासाठी सूचना आणि शिफारशी देणाऱ्या १० लाख नागरिकांचे ई-मेल आयडी जाहीर करीत ट्रायने लोकांच्या खासगीपणाच्या मुद्याशी तडजोड केलेली आहे.- डेरेक ओ ब्रायन, लक्षवेधी मांडणारे तृणमूल खासदार