शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोतस्करीच्या संशयावर कथित गोरक्षकांचा दोघांवर हल्ला

By admin | Updated: May 6, 2017 09:11 IST

ग्रेटर नोएडामधील कथित गोरक्षकांकडून गोतस्करीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - ग्रेटर नोएडामधील कथित गोरक्षकांकडून गोतस्करीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जबर सिंह(35) आणि भूप सिंह (45) या दोघांनी एक गाय व तिचे वासरू शेजारी असलेल्या एका गावातून खरेदी केले.  गाय व तिचे वासरु घरी आणताना प्रवासादरम्यान एका ठिकाणी विश्रांतीसाठी हे दोघं जण थांबले तेव्हा गोरक्षकांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप या दोघांनी केला आहे. 
 
गो-तस्कर नसल्याचा विश्वास पटवून दिल्यानंतर या दोघांची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भूप सिंह यांनी शेजारी असलेल्या मेहंदीपूर गावातून गायसहीत तिच्या वासराची खरेदी केल्यानंतर त्यांना घेऊन ते निवासस्थानाकडे परतत होते. 
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाय-वासरू घेऊन जाणारे दोघंही पायी प्रवास करत होते. चालून चालून थकल्यानं एका झाडाचा आडोसा घेत ते विश्रांतीसाठी तेथे थांबले.  याचदरम्यान कथित गोरक्षकांचा गट येथे दाखल झाला. 
 
तक्रारीमध्ये भूप सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, आमच्यावर जवळपास 8 ते 9 जणांनी हल्ला केला. कोणतेही ठोस कारण नसतानाही हल्ला करण्यात आला व काहीही विचारपूस न करता टोळक्यानं थेट मारहाण करायला सुरुवात केली. आम्ही गो-तस्कर नसून दुग्धोत्पादनसंबंधी काम करत असल्याचं सांगितल्यानंतर हल्लेखोरांनी आमची सुटका केली.
 
भूप सिंह यांच्या कुटुंबातील एका सदस्यानं सांगितले की, आम्ही गरीब आहोत. आम्हाला डेअरीच्या कामासाठी गाय हवी होती. यावरचे आमचे व कुटुंबीयांचे पोट भरते. दरम्यान, कथित गो-रक्षकांनी केलेल्या हल्ल्यात दोघं बरेच जखमी झाले आहेत. 
हल्ल्यात जखमी झालेल्या या दोघांना सुरुवातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना नोएडातील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
 
बेदम मारहाणीमुळे दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. जेवरचे पोलीस अधिकारी अजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 5 अज्ञातांचा समावेश आहे. मारहाण करणा-यांपैकी महेश, आशीष ओमपाल आणि गौरव या चौघांची ओळख पटली असून, हे जवळपासच्या परिसरातच राहणारे आहेत.
 
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या गौरक्षा युनिटनं अशा प्रकारच्या कारवाईमागे ते नसल्याचे स्पष्ट केले आहे.