शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या

By admin | Updated: June 29, 2017 21:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावावर चाललेल्या हत्यांचा निषेध केला असला तरी देशभराच गोरक्षणाच्या नावाखालील गुंडगिरी

ऑनलाइन लोकमत
रामगड, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावावर चाललेल्या हत्यांचा निषेध केला असला तरी देशभराच गोरक्षणाच्या नावाखालील गुंडगिरी सुरूच आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला काही तास उलटत नाहीत तोच मोकाट सुटलेल्या गोरक्षकांनी झारखंडमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या केली आहे. 
अलिमुद्दीन उर्फ असगर अंसारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अलिमुद्दीन याचा मांसाचा व्यापार होता. आज तो मारुती व्हॅनमधून मांस नेत असताना त्याच्या गाडीत बीफ असल्याची अफवा परसली. त्यानंतर जमावाने बाजार टांड गावाजवळ त्याच्या गाडीवर हल्ला केला. तसेच गाडीलाही आग लावली.  जमावाने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या अलिमुद्दीनला पोलिसानी रुग्णालयाच दाखल केले, पण तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 झारखंड पोलिसांचे प्रवक्त्यांनी सांगितले की, प्राथमित तपासात नियोजबद्धरित्या ही हत्या घडवून आणल्याचे दिसत आहे. तसेच मृताच्या पूर्ववैमस्यातून ही हत्या झाली का या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.  मृताच्या वाहनातून मांस सापडले आहे. पण ते बंदी घातलेले मांस आहे का हे तपासानंतरच सिद्ध होणार आहे. दरम्यान या प्रकरणात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
दरम्यान, आज सकाळीच गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला होता.  गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते, असे मोदी म्हणाले होते.