शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : मृतांची संख्या १0५ वर, बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:56 IST

गोरखपूर : बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. गुरुवार व शुक्रवारी १0 जणांचे मृत्यू झाल्याने हॉस्पिटल प्रशासनानेही मान्य केले.आॅगस्टरच्या दुसºया आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर ...

गोरखपूर : बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. गुरुवार व शुक्रवारी १0 जणांचे मृत्यू झाल्याने हॉस्पिटल प्रशासनानेही मान्य केले.आॅगस्टरच्या दुसºया आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा ७ आहे, असे मान्य केले. नंतर संख्या ६३ वरून वाढत गेली आणि आता ती १0५ झाली.हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनीजबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीयांनी रविवारी सकाळी गोरखपूरमध्येयेऊ न चार मृत मुलांच्या नातेवाईकांचीभेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ हेही गोरखपूरला आले आणि त्यांनीहातात झाडू घेऊ न, परिसर स्वच्छ करतानाची छायाचित्रे काढून घेतली. त्यानंतर गोरखपूरला पिकनिक स्पॉट बनवण्याची परवानगी युवराजांना दिली जाणार नाही, असे विधान राहुल गांधी यांना उद्देशून केले.आपल्यासोबत कोणीही डॉक्टर अथवा अ‍ॅम्बुलन्स नकोय, असे राहुल यांनी दौºयाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. डॉक्टरांची गरज मेंदूज्वराच्या रुग्णांना आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Gorakhpurगोरखपूर