शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:57 IST

राजधानी पाटणा शहरानजीक शनिवारी रात्री एका ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली.

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा शहरासह संपूर्ण राज्यात गुंडाराजसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिना सुरू झाल्यापासून रविवारपर्यंत या राज्यात ३० पेक्षा अधिक लोकांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजधानी पाटणा शहरानजीक शनिवारी रात्री एका ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली.

पाटणा शहरानजीकच्या पिपरा क्षेत्रातील शेखपुरा गावालगतच्या शेतात ५० वर्षीय आरोग्य अधिकारी सुरेंद्र कुमार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळया झाडून हत्या केली. ग्रामस्थांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर ते शेतात दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुमार यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसची टीकाबिहार व पाटणा शहरातील गोळीबार व हत्येचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने राज्यातील जदयू-भाजपच्या सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने एक्स सोशल मीडियावर रविवारी एक पोस्टर शेअर करत जुलै महिन्यात कोणत्या तारखेला कुठल्या शहरात किती लोकांची हत्या झाली, त्यासंदर्भात सविस्तर आकडेवारी दिली. त्यामुळे राज्यातील गोळीबार व हत्या प्रकरणाचे गांभिर्य जास्तच वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत बिहार सरकारविरोधात पोस्टर वार सुरू केले आहे.

टॅग्स :Biharबिहार