शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय छोट्या, मध्यम उद्योगांना गुगलची सेवा

By admin | Updated: January 6, 2017 02:00 IST

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल अनलॉक्ड् नावाची नवी सेवा सुरू केली आहे

नवी दिल्ली : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल अनलॉक्ड् नावाची नवी सेवा सुरू केली आहे. फिक्कीच्या सहकार्याने सुरू केलेल्या सेवेत ९0 दिवसांचे ट्रेनिंग व्हिडीओ व आठ तासांचा ट्रेनिंग कार्यक्रम आहे.पिचाई यांनी सांगितले की, मी चेन्नईत शिक्षण घेत होतो, तेव्हा माहिती ही दुर्मीळ बाब होती. तथापि, इंटरनेटमुळे आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही माहितीचा स्रोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करीत आहोत. इंटरनेटच्या मदतीने छोटे उद्योगही मोठे होऊ शकतात. नोटाबंदीच्या काळात वॉलनटच्या अ‍ॅपने २ दशलक्षावरून ५ लक्ष वापरकर्त्यांवर घेतलेली झेप हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सायबर सुरक्षा व मजबुती या मुद्द्यात लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी गुगलला केले.या सेवेचा लाभ घेण्यासाठी छोट्या व मध्यम उद्योगांना डिजिटल अनलॉक्ड्च्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. भारतभरातील ४0 शहरांत ५ हजार वर्कशॉप घेण्याची गुगलची योजना आहे. प्रीमिअर नावाचे अ‍ॅपही उपलब्ध होईल. हिंदी, इंग्रजी, तामिळी, तेलगू आणि मराठी या भाषांत ते विकसित केले जात आहे. हे मोफत अ‍ॅप आॅफलाइनही काम करील. (लोकमत न्यूज नेटवर्क)