शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचे इन ऍप्स सर्च

By admin | Updated: September 1, 2016 12:45 IST

गुगलने नुकतेच एक ऑफलाईन अँड्रॉइड स्मार्टफोन सर्च फिचर लाँच केले आहे. जो तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन ऑफलाईन सर्च करेल.

अनिल भापकर
काही दिवसापूर्वी तुम्ही तुमच्या मित्रासोबत स्मार्टफोन वर चॅट करत असताना त्याने तुम्हाला  शहरात नुकतेच नविन उघडलेल्या रेस्टॉरंट विषयी सांगितले होते. आणि आज तुमचा त्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचा मुड आहे. मात्र आता तुम्हाला त्या रेस्टॉरंटचे नावच आठवत नाही. तुमचा मित्र फोन उचलत नाही शिवाय जुना चॅट मेसेज असल्यामुळे शोधायला वेळ लागेल अशा वेळी काय कराल ?गुगलने तुमच्या या समस्यांचे निराकरण नुकतेच एक नवीन फिचर लाँच करून केले आहे. त्या फिचर चे नाव आहे इन ऍप्स . याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर रेस्टॉरंट असा सर्च दिला कि तुमच्या स्मार्टफोन वर ज्या ज्या ठिकाणी रेस्टॉरंट हा शब्द आलेला आहे ते सर्व क्षणात तुमच्या समोर हजर होईल.
आतापर्यंत गुगल सर्च म्हटले कि वेब सर्च असाच त्याचा अर्थ होत असे . मात्र आता गुगलने नुकतेच एक ऑफलाईन अँड्रॉइड स्मार्टफोन सर्च फिचर लाँच केले आहे. जो तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन ऑफलाईन सर्च करेल. याचा वापर  करून तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वरील कन्टेन्ट शोधू शकता . शिवाय हा सर्च ऑफलाईन असल्यामुळे त्यासाठी इंटरनेट ची सुद्धा गरज नसेल.

सध्या तरी इन ऍप्स फक्त जीमेल ,स्पोटिफाय ,युट्युब आदींसोबत सर्च करेल मात्र लवकरच एव्हरनोट ,फेसबुक मेसेंजर, ग्लाइड, लिंक्डइन, टू-डू-लिस्ट, आदी ऍप्स साठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे गुगलने सांगितले आहे. शिवाय नवीन येणाऱ्या अँड्रॉइड ओएस सोबत होम स्क्रीन वरच इन ऍप्स चा शॉर्टकटही असेल.