शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गुगल लेन्स : स्मार्ट इमेज सर्च

By admin | Updated: May 18, 2017 18:33 IST

गुगल ला टेक्नोसॅव्ही जगता मध्ये कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते . अशी आख्यायिका आहे कि कल्पवृक्षा खाली बसून कुठलीही इच्छा व्यक्त केली ती क्षणात पूर्ण होते.

अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - गुगल ला टेक्नोसॅव्ही जगता मध्ये कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते . अशी आख्यायिका आहे कि कल्पवृक्षा खाली बसून कुठलीही इच्छा व्यक्त केली ती क्षणात पूर्ण होते. अगदी तसेच या टेक्नोसॅव्ही जगता मध्ये गुगलकडे तुम्ही कुठलीही माहिती मागितली की ती क्षणात पूर्ण होते . गुगल हीच त्यांची ख्याती टिकवून ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहेनत करीत आहे. नुकतच गुगलच्या आय /ओ डेव्हलपर कॉन्फेरंस मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी एका नवीन टेक्नोलॉजीची घोषणा केली ज्याचे नाव आहे गुगल लेन्स . इंटरनेट सर्चची परिभाषाच बदलून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानाची नुकतीच गुगलने डेव्हलपर कॉन्फेरंसमध्ये घोषणा केली . आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरून गुगल तुमच्या स्मार्टफोन चा कॅमेरा गुगल लेन्स ऍप च्या मदतीने अधिक स्मार्ट बनविणार आहे. गुगल लेन्स ऍप च्या मदतीने जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन चा कॅमेरा एखाद्या फुलावर रोखाल तेव्हा गुगल लेन्स ऍप तुम्हाला लगेच सांगेल की हे फुल कुठले आहे तसेच त्याबद्दलची सगळी माहिती तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर दिसेल. दुसरे उदाहरण सुंदर पिचई यांनी दिले की समजा तुम्ही एखाद्या दुकानासमोरून जात आहात आणि तुम्ही त्या दुकानाच्या बोर्ड वर स्मार्टफोन कॅमेरा धरला तर गुगल लेन्स ऍप लगेच त्या दुकानासंबंधी सर्व माहिती तुमच्या स्मार्टफोन स्क्रीन वर दाखवेल. तिसरे उदाहरण सुंदर पिचई यांनी दिले की तुमच्या घरात जो वाय-फाय राउटर आहे त्याच्या स्टिकर वर जर तुम्ही स्मार्टफोन कॅमेरा धरला तर गुगल लेन्स लगेच तुमच्या वाय-फाय चा पासवर्ड टाकून कनेक्ट होईल .एकूणच काय तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणावर किंवा वस्तूवर किंवा आणखी कुठेही स्मार्टफोन कॅमेरा धराल त्या विषयी माहिती क्षणात तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर दिसेल .आहे की नाही जादु.