शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात चांगले लोक यायला हवेत - जावडेकर

By admin | Updated: May 18, 2017 04:16 IST

व्यवस्थेचे संचालन करण्यासाठी लोकसंपर्क असलेले चांगले लोक राजकारणात आले नाहीत तर जनतेला राजकारणाबद्दल वाटणाऱ्या भीतीची पोकळी कधीच भरून

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : व्यवस्थेचे संचालन करण्यासाठी लोकसंपर्क असलेले चांगले लोक राजकारणात आले नाहीत तर जनतेला राजकारणाबद्दल वाटणाऱ्या भीतीची पोकळी कधीच भरून निघणार नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने जो पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला आहे, तो उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. दिल्लीच्या कॉन्स्टिटयुशन क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात, म्हाळगी प्रबोधिनीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेल्या ‘नेतृत्व, राजकारण व शासन व्यवस्था’ या विषयांशी निगडीत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास विशेष अतिथी या नात्याने व्यासपीठावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी, पी. मुरलीधर राव आदी उपस्थित होते. म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी प्रास्ताविक केले.उद्घाटन सोहळ्यात बोलतांना माजी निवडणूक आयुक्त कुरेशी म्हणाले, भारतीय लोकशाही केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही नव्हे तर जगातल्या ९0 देशांच्या एकुण मतदारांची बेरीज केली तरी त्यापेक्षा भारतीय लोकशाहीचा आकार मोठा आहे. इतक्या अवाढव्य व्यवस्थेचे संचालन आदर्श पध्दतीने व्हावे यासाठी सरकार चालवणारे मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, त्यांचे लहान मोठे नेते या सर्वांनाच खास प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ४० विद्यार्थ्यांना प्रवेश, १७ पासून अर्ज स्वीकृतीम्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून मुंबईत कार्यरत आहे. आदर्श समाजसेवक व लोकप्रतिनिधी तयार करणे हा संस्थेचा उद्देश आहे. संस्थेने यंदाच्या वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन लिडरशिप पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला असून पहिल्या वर्षात ४0 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी १७ मे ते २0 जून दरम्यान प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.