शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चांगले दिवस आता गेले - शरद पवार

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे

नवी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने साखर व दूधपावडर निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केंद्रातील आताच्या सरकारमुळे चांगले दिवस आता गेल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून, आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे झालेल्या माथाडी मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले की, काही दिवस देश व राज्यातील वातावरण वेगळे झाले होते. यामुळे केंद्रातील सत्तेत बदल झाला. चांगले दिवस येणार, असे स्वप्न दाखविल्यामुळे लोकांनी हा बदल घडविला. परंतु चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. कृषिमंत्री असताना साखर व दूधपावडर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. निर्यात करताना नुकसान झाल्यास अनुदान देण्यास सुरुवात केली. परंतु आताच्या सरकारने हे अनुदान बंद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, आपले शेतकरी जगातील मोठ्या देशांशी स्पर्धा कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माथाडी संघटनेला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कामगारांना न्याय मिळवून देणारी अशी संघटना देशात नाही. आता झाडावर बांडगुळे वाढल्याप्रमाणे काही संघटना झाल्या असून ते कामगारांना न्याय देऊ शकत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, आपली माणसे विधानसभेवर पाठवा, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही माथाडी व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार यांनी खूप सहकार्य केल्याचे सांगितले. माथाडी नेते व जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे व आमदार नरेंद्र पाटील यांनी कामगारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)