शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेडिओला अच्छे दिन, "मन की बात"द्वारे कमावले करोडो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 21:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "मन की बात" या कार्यक्रमामुळे सरकारी रेडिओ स्टेशनला व्यवसायिक फायदा झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "मन की बात" या कार्यक्रमामुळे सरकारी रेडिओ स्टेशनला व्यवसायिक फायदा झाला आहे. ऑल इंडिया रेडिओला मन की बात मुळे दहा कोटी रुपयांची कमाई झाली आहे. लोकसभेत बोलताना माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या मन की बातमधून ऑल इंडिया रेडिओने 2016-17या आर्थिक वर्षात 5.19 कोटींची कमाई केली आहे, तर 2015-16 मध्ये 4.48 कोटींची कमाई केली होती. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम हिंदी भाषेशिवाय 18 प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. याशिवाय इंग्रजी आणि संस्कृत भाषांमध्येही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते, अशी माहिती राठोड यांनी लोकसभेला दिली3 ऑक्टोंबर 2014 मध्ये मन की बात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बादद्वारे जनतेशी संवाद साधतात. मन की बातमधून देशातील महत्त्वाच्या घटनांवर पंतप्रधान भाष्य करतात. यासोबतच देशातील सणांनिमित्त शुभेच्छा देतात. याशिवाय चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे कौतुकदेखील केले जाते. कार्यक्रमापूर्वी पाच मिनिटं आणि कार्यक्रमानंतर दोन मिनिटांची जाहिरात प्रसारित करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. या सात मिनिटांत ऑल इंडिया रेडिओ स्वत:च्या कार्यक्रमांची जाहिरातही करते. ऑल इंडिया रेडिओकडून मोदींच्या या कार्यक्रमादरम्यान 10 सेकंदाच्या एका जाहिरातीसाठी दोन लाख रूपये घेण्यात येतात.

अधिक वाचा