दौंडचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी ३ लाखांचा धनादेश
दौंडचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ
मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी ३ लाखांचा धनादेशदौंड : दौंड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांच्या मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी ३ लाख रुपयांचा धनादेश गावचे पाटील तथा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांच्याकडे देण्यात आला. प्रशांत मगर, मनोज फराटे यांच्या वतीने दोन लाख रुपये, तर हरिओम उद्योग समूहाचे राजेश पाटील, रोहित पाटील यांच्या वतीने १ लाख रुपये, असा तीन लाखांचा धनादेश देण्यात आला. ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ हे नवसाला पावणारे देवस्थान असून मंदिर पुरातनकालीन होते. गावचे पाटील तथा माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिराचा जीणार्ेद्धार सुरू आहे. नयनमनोहारी मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, पंचक्रोशीतील भाविकांनी तसेच शहरातील व्यापारी आणि विविध सेवाभावी संस्थांनी या मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. मंदिराचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. पुढच्या वर्षी श्री काळभैरवनाथांच्या यात्रेपूर्वी हे मंदिर पूर्णत्वाकडे गेले असेल. चौकट* भाविकांनी मदतीसाठी पुढे यावेश्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी ज्या भाविकांना किंवा दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल, त्यांनी माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील, सुमतीलालजी कटारिया यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फोटो ओळ : दौंड येथील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या जीणार्ेद्धारासाठी गावचे पाटील इंद्रजित जगदाळे यांच्याकडे तीन लाखांचा धनादेश सुपूर्त करताना भाविक.(कृपया फोटोसह बातमी घेणे, ही विनंती)03082015-िं४ल्लि-16-------------------