मलकापूर अर्बनचा आज सुवर्णमहोत्सवी सोहळा
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
मलकापूर : मलकापूर येथील मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सुवर्णमहोत्सव सोहळा व मुख्य कार्यालय इमारत उद्घाटन प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष गणेश कोलते यांनी दिली.
मलकापूर अर्बनचा आज सुवर्णमहोत्सवी सोहळा
मलकापूर : मलकापूर येथील मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सुवर्णमहोत्सव सोहळा व मुख्य कार्यालय इमारत उद्घाटन प्रारंभ उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष गणेश कोलते यांनी दिली. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार व पणनवस्त्र उद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विनय कोरे, तर उद्घाटन आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, राजू शेी, आमदार सत्यजित पाटील, रमेश लटके, अमल महाडिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष नंदकुमार कोठावळे यांनी केले आहे.