शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीच्या पॅन सक्तीला विरोध !

By admin | Updated: March 17, 2015 23:57 IST

सोने खरेदी व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचे असेल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात केल्यानंतर, याचा जोरदार विरोध सराफ संघटनांनी केला आहे. ‘

मुंबई : एक लाख रुपयांवरील सोने खरेदी व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचे असेल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात केल्यानंतर, याचा जोरदार विरोध सराफ संघटनांनी केला आहे. ‘द आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ या प्रमुख संघटनेने हा निर्णय रद्द न केल्यास देशव्यापी संपाचा इशाराही दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष हरेश सोनी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मुळामध्ये सोन्याच्या खरेदीचे देशातील प्रमाण बघितले, तर ७० टक्के व्यवहार हे ग्रामीण भागातून होतात, तर ३० टक्के व्यवहार हे शहरी भागातून होतात. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश लोकांतर्फे कर प्रणालीतील विविध सुटीमुळे कर भरणा होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पॅन कार्ड नाही. तसेच, गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमतीचा ट्रेंड बघितला तर तो तेजीचा आहे. सोन्याच्या किमती सातत्याने प्रति तोळा २५ हजार रुपये ते ३० हजार रुपये तोळा या दरम्यान आहेत. त्यामुळे सणासुदीनिमित्त अथवा एखाद्या मंगल कार्यासाठी जरी किमान सोने खरेदी झाली तरी त्याची किंमत एक लाख रुपयांच्या वर जाते. त्यात जर सरकारने पॅन कार्ड जर सक्तीचे केले तर त्याचा मोठा फटका या उद्योगाला बसेल. (प्रतिनिधी)४उपलब्ध आकडेवारीनुसार देशात पॅनकार्डधारकांची संख्या ही १२ कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी एक कोटी ४० लाख पॅन कार्ड गेल्यावर्षी जारी करण्यात आले. ४एकूण लोकसंख्येच्या तुलनेत पॅन कार्ड धारकांची संख्या ही जेमतेम साडेबारा टक्के इतकी आहे. त्यामुळे अशा निर्णयाचे तीव्र पडसाद या उद्योगावर उमटू शकतात. ४भारतीय लोकांची सोन्याची हौस, व्यवहारांचे प्रचंड प्रमाण लक्षात घेता पॅन कार्ड सक्तीची मर्यादा एक लाख रुपयांवरून दहा लाख रुपये इतकी वाढवावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. तसेच, सोन्यावरील आयात शुल्कातही कपात करण्याची मागणी केली आहे.