सोन्याचा सीलसिला सुरूच
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
दाबोळीत 25 लाखांचे सोने जप्त
सोन्याचा सीलसिला सुरूच
दाबोळीत 25 लाखांचे सोने जप्त दोन संशयित प्रवासी ताब्यात आठवड्यातील तिसरी कारवाई वास्को : येथील दाबोळी विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा सीलसिला सुरूच आहे. सीमा शुल्क अधिकार्यांनी शुक्रवारी पहाटे 25 लाखांचे सोने जप्त केले. या अधिकार्यांनी भटकळ (जिल्हा उत्तर कन्नडा, कर्नाटक ) येथील दोघा प्रवाशांना ताब्यात घेतले. शहीद महम्मद, मैलप्पी हिनायतुल्लान अशी त्यांची नावे आहेत.सीमा शुल्क अधिकार्यांच्या कडक कारवाईमुळे सध्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघा प्रवाशांकडून सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार शोधण्यास मदत होईल, असे सूत्रांनी सांगितले.दोघांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहितीही देण्यात आली.दुबई-गोवा मार्गावरील एअर इंडिया विमानातून आलेल्या दोन प्रवाशांनी सोने तस्करीचा प्रयत्न केला़ त्यापैकी एक प्रवासी दुबई येथे, तर दुसरा प्रवासी मुंबईत विमानात चढला होता.दाबोळी विमानतळावर या दोन्ही प्रवाशांनी आपल्याकडे सोने असल्याचे जाहीर केले नव्हते, तसेच परदेशातून आणलेल्या वस्तूंची किंमत शून्य असल्याचे दाखवून त्यांनी ‘ग्रीन चॅनल’मधून विमानतळाबाहेर पडण्याचा मार्ग अवलंबिला होता; पण या मार्गातून जाताना ते काहीसे घाबरे-घुबरे दिसल्याने अधिकार्यांना संशय आला. दोघांची कसून झडती घेतली असता शहीद महम्मद याने अंतर्वस्त्रामध्ये प्रत्येकी 10 तोळ्याची नऊ बिस्किटे लपवल्याचे आढळल़े त्यांची एकूण किंमत 25 लाख 25 हजार रुपये होते. या वेळी अधिकार्यांनी मैलप्पी हिनायतुल्लान आणि शहीद महम्मद यांचा जबाब घेतला. दुबई येथून विमानात चढलेल्या मैलप्पी हिनायतुल्लानने ही बिस्किटे दिल्याचे शहीदने सांगितले. सीमा शुल्क कायदा 1962 कलम 110 अन्वये (सोने तस्करी) संशयितांवर सोने तस्करी गुन्?ाखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे सीमा शुल्क अधिकार्यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)