मुंबई : जागतिक पातळीवर सोन्याची मागणी यंदा दुस:या तिमाहीत 16 टक्क्यांनी घटून 964 टनावर आली. ग्राहक आणि गुंतवणूकदार हे सोन्याच्या भावातील अनिश्चिततेमुळे सावध राहिले, यामुळे ही घट नोंदल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या दुस:या तिमाहीसाठी सोन्याच्या मागणीसंबंधीचा अहवाल जारी केला आहे. यानुसार 2क्13 च्या दुस:या तिमाहीत सोन्याची एकूण मागणी 1,148 टन एवढी होती. किमतीच्या दृष्टीने 2क्14 च्या दुस:या तिमाहीत सोन्याची मागणी 2क्13च्या याच कालावधीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी घटून 4क् अब्ज डॉलर एवढी राहिली.
सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक (गुंतवणूक धोरण) मार्कस ग्रब यांनी सांगितले की, 2क्13 सालातील असाधारण परिस्थितीत ग्राहकांची मागणी गुंतवणूकदारांद्वारे खरेदी झाली होती. यानंतर बाजार स्थिर होण्यास प्रारंभ झाला. अहवालाच्या कालावधीतच मध्यवर्ती बँकेची खरेदी 28 टक्क्यांनी वाढून 118 टन झाली. गेल्यावर्षी याच काळात 92 टन खरेदी झाली होती. सलग 14 व्या तिमाहीत मध्यवर्ती बँकेकडून सोन्याची खरेदी करण्यात आली. (प्रतिनिधी)
च्ग्राहकांना सोन्याचा भाव कमी होऊन 25 हजाराच्या पातळीवर येईल, अशी अपेक्षा होती. दुसरीकडे, सार्वत्रिक निवडणुकीमुळे बाजारातील अनिश्चिततेचाही मागणीवर नकारात्मक परिणाम झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
च्परिषदेचे भारतातील महासंचालक सोमसुंदरम् पीआर यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षाच्या दीर्घकालीन सरासरीच्या दृष्टीने दुस:या तिमाहीत जोरदार मागणी झाली.अहवालात नमूद करण्यात आले आहे.
च्दुस:या तिमाहीत किमतीच्या दृष्टीने देशात सोन्याची मागणी 41 टक्क्यांनी कमी होऊन 5क्,564.3 कोटी रुपयांवर गेली, तर 2क्13 मध्ये याच काळात ती 85,533.8 कोटी रुपये एवढी होती.
च्2क्14 च्या दुस:या तिमाहीत सोन्याची मागणी 39 टक्क्यांनी घटून 2क्4.क्क् टन राहिली. 2क्13 मध्ये याच तिमाहीत 337 टन सोन्याची मागणी झाली होती, असे सुवर्ण परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.