शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जावयासोबत सासू रफुचक्कर

By admin | Updated: December 12, 2015 00:30 IST

जळगाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने नातेवाईक व पोलिसांचीही पंचाईत झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला समजोता सुरुच होता.

जळगाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार दिल्याने नातेवाईक व पोलिसांचीही पंचाईत झाली होती, रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला समजोता सुरुच होता.
भुसावळ तालुक्यातील एका गावातील तरुणाचे जळगाव शहरातील एका तरुणीशी पाच महिन्यापुर्वी विवाह झाला होता. गावात काहीच कामधंदा नसल्याने तो जळगावातच सासर्‍याच्या शेजारी घर घेवून वास्तव्याला होता. सासर्‍याने त्याला घरगुती मेसमध्ये कामाला लावले परंतु, तेथेही काही दिवसातच त्याने काम सोडले. पत्नी दुसरीकडे धुणी-भांडी तसेच मिळेत तो रोजगार करीत होती. या तरुणाला काहीच कामधंदा नसल्याने तो घरीच राहत होता. सासरा कामावर तर इकडे पत्नीही कामावर असल्याने दोघांच्या घरी सासू व जावई हेच एकटे राहत होते. त्यात दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटला. प्रेम इतके बहरले की दोघांनी तीन नोव्हेंबर रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचे बींग फुटल्याने तरुणाच्या भावाने मात्र त्यावर पडदा टाकण्याचे काम केले. दोघं जण कामानिमित्त बाहेर गावी असल्याचे तो वांरवार सांगू लागला. शेवटी तरुणाच्या पत्नीने व सासर्‍याने शुक्रवारी पोलीस स्टेशन गाठले. सकाळी दोघांना पोतिलसांनी फोनवरुन दम दिला, तेव्हा ते मुक्ताईनगरला असल्याचे समजले. त्यावरुन मुलीच्या नातेवाईकांनी स्वतंत्र वाहनाने मुक्ताईनगर गाठून दोघांना पोलीस स्टेशनला आणले.
सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी व दोघांच्या नातेवाईकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात जावई पत्नीसोबत जायला तयार झाला तर सासूने मात्र पतीसोबत जाण्यात नकार दिला. जावयासोबत जाण्यास मात्र ती राजी झाली होती. रात्री उशिरा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु होता.