साक्षी महाराजांची दिलगिरी : विरोधी पक्षांनी वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास भाग पाडले
नवी दिल्ली : भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त संबोधल्यावरून लोकसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. या मुद्यावरून एकजूट झालेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी साक्षी महाराजांना त्यांच्या ‘गोडसे स्तुती’बद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास आणि आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास भाग पाडले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही सरकार आणि भाजपा सदस्यांविरुद्ध घोषणा देणा:या विरोधकांत सामील झाल्या होत्या.
लोकसभा अध्यक्ष्या सुमित्र महाजन यांनी 13 डिसेंबर 2क्क्1 रोजीच्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताच काँग्रेस आणि बिजदच्या सदस्यांनी साक्षी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला.
या मुद्यावर चर्चा करण्यासाठी दिलेला स्थगन प्रस्ताव आणि प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी आपण फेटाळली आहे, असे महाजन यांनी सांगताच विरोधक संतप्त झाले.
काँग्रेस, राजद, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य मोदी सरकार आणि साक्षी महाराज यांच्याविरोधात घोषणा देत हौदात गोळा झाले. यावेळी साक्षी महाराज सभागृहात हजर होते.
विरोधी सदस्यांनी ‘हे राम, हे राम, गांधी के हत्यारे को दिया सन्मान’ आणि ‘दोषी सरकार हाय हाय’, अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणोतच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. परंतु विरोधकांचा गदारोळ सुरूच असल्याने कामकाज झाले नाही.
परिणामी महाजन यांनी सकाळी 11.25 वाजता 1क् मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज सुरू होताच संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू म्हणाले, ‘कुणीही महात्मा गांधींच्या मारेक:याचे उदात्तीकरण सहन करू शकत नाही. साक्षी महाराज जे काही बोलले त्याच्याशी सरकार व भाजपा सहमत नाही.’
(लोकमत न्यूज नेटवर्क)
दिलगिरी व्यक्त करताना काँग्रेसवर आरोप
4या दरम्यान साक्षी महाराज यांनी गोडसेबाबतच्या केलेल्या विधानावर सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. ‘ मी महात्मा गांधी आणि या सभागृहाचा सन्मान करतो. मी माङो वक्तव्य मागे घेतो. गोडसेने अनेक वर्षापूर्वी महात्मा गांधींची हत्या केली होती. परंतु तुम्ही 1984 च्या शीखविरोधी दंगलीत महात्मा गांधींच्या विचारांचीच हत्या केली,’ असे साक्षी महाराज म्हणाले.
4काँग्रेस सदस्यांनी साक्षी महाराजांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतला.