शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोदातीरी आज पहिले कुंभस्नान !

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर नटले : पर्वणी अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू दाखलनाशिक : धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत. श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात शनिवारी गोदातीर्थावर पहिले कुंभस्नान होणार आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरनगरी नववधूसारख्या नटल्या आहेत.शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या ...


नाशिक-त्र्यंबकेश्वर नटले : पर्वणी अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू दाखल

नाशिक : धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत. श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात शनिवारी गोदातीर्थावर पहिले कुंभस्नान होणार आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरनगरी नववधूसारख्या नटल्या आहेत.
शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणार्‍या प्रशासनाची शनिवारी कसोटी लागणार आहे. नाशिकक्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांचे शाहीस्नान होईल, त्यानंतर भाविकांना रामकुंड व कुशावर्त खुले केले जाईल.
त्र्यंबकेश्वरी शनिवारी पहाटे ब्रšामुहूर्तावर ४.१५ वा. जुना आखाड्याचे साधू-महंत प्रथम शाहीस्नान करतील, तर नाशिकला सकाळी ७ वा. निर्वाणी अनी आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान करतील.
सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी ९ तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धमार्ेत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकीचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.
शाही पर्वणी निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंड आणि कुशावर्ताचा ताबा घेतला. साधू-महंतांचे स्नान होईपर्यंत भाविकांना दोन्ही तीर्थावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
-------------------------
साध्वींची स्वतंत्र व्यवस्था नाही
महिला साध्वींच्या स्वतंत्र स्नानाची व्यवस्था पहिल्या पर्वणीत करण्यात आलेली नाही. प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था व वेळ देण्याच्या साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्याबाबत न्यायालयाने तोडगा काढण्याचे सुचविले आहे. सोमवारी त्याबाबत बैठक होणार आहे.
-------------------------
शाही स्नानास सुरुवात
- त्र्यंबकेश्वर : ब्रšामुहूर्तावर पहाटे ४.१५ वा.
- नाशिक : सकाळी ७ वा.
--------------------------------