शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट कमी काळात देण्यात गोवा अव्वल !

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

पासपोर्ट देण्यात गोवा आणि पंजाबमधील जालंधरने तत्परता दाखवत ठरवून दिलेल्या २१ दिवसांच्या वेळेपूर्वी काम पूर्ण केले, तर महाराष्ट्रातील ठाणे येथील पोलिसांनी व्हेरिफिकेशनचे काम करण्यासाठी ६१ दिवसांचा वेळ घेतला. परिणामी, केवळ ९ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण होऊ शकले.‘लोकमत’च्या हाती लागलेल्या तपशिलानुसार, महाराष्ट्रातील केवळ ठाणेच नव्हे, तर इतरही महत्त्वाच्या शहरांनी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी खूपच वेळ घेतलेला आहे. २०१५-१६ दरम्यान, पुणे पोलिसांनी यासाठी ६५ दिवसांचा वेळ घेतला व केवळ १८ टक्के अर्जांची पूर्तता केली. नागपुरातही फारशी वेगळी स्थिती नव्हती. तेथे पोलिसांनी ४४ दिवस घेतले व केवळ २२ टक्केच अर्जांची पूर्तता केली. मुंबईत त्या तुलनेत थोडी बरी स्थिती आहे. तेथे पोलिसांनी २६ दिवसांत आपले काम पूर्ण केले व ६९ टक्के पासपोर्टची मागणी पूर्ण होऊ शकली. २०१३-१४ मध्ये यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल ७४ दिवसांचा वेळ घेतला व केवळ ३ टक्केच अर्जदारांचे काम पूर्ण झाले. २०१४-१५ मध्ये कामगिरी थोडीशी सुधारत २८ टक्के अर्जदारांचे काम ६० दिवसांत पूर्ण झाले. २०१५-१६ मध्ये मात्र कामगिरी सुधारत, मुंबईने ६९ टक्के अर्जांची पूर्तता केली. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सांगण्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत कमालीची गती घेतली. गोव्याने तर २०१५-१६ मध्ये अर्ज २१ दिवसांऐवजी केवळ १२ दिवसांतच पूर्णत्वाला नेले. जालंधरनेही याबाबत गतीने काम करताना १५ दिवसांत अर्जांची पूर्तता केली. गुवाहाटी (६ टक्के), श्रीनगर (१ टक्के) आणि जम्मू (२ टक्के) यांनी पासपोर्ट देण्याबाबतच्या यादीत तळ गाठला. मेट्रोंमध्ये कोलकत्याने २०१५-१६ मध्ये २० टक्क्यांची सर्वांत वाईट कामगिरी केली. पाटण्यानेही कोलकात्याची बरोबरी केली. हैदराबादने ९७ टक्के, दिल्लीने ९३ टक्के, चेन्नईने ६७ टक्के, लखनऊने ६० टक्के, तर बंगळुरूने ५० टक्के कामगिरी केली.कामगिरी सुधारलीदेशाने पासपोर्ट अर्जांची पूर्तता करण्याची कामगिरी २०१५-१६ मध्ये ६४ टक्क्यांपर्यंत सुधारून सरासरी ३२ दिवसांत हे काम पूर्णत्वास नेले. ८६.४० लाख या संख्येच्या अर्जदारांना पासपोर्ट देण्यात आले. २०१३-१४ मध्ये तब्बल ६५.३७ लाख जणांना पासपोर्ट देण्यात आले. त्यावर्षी सरासरी ४७ दिवसांचा कालावधी लागला आणि प्रमाण होते ३९ टक्के.