शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मंत्री मिकी पाशेकोंना ६ महिने कैद

By admin | Updated: March 31, 2015 02:25 IST

वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकास मंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब

सुशांत कुंकळयेकर, मडगाव (गोवा) वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकास मंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाला पाशेको यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला व न्या. शिवकीर्ती सिंह यांनी त्यांचा आव्हान अर्ज फेटाळला. परिणामी पाशेको यांना एका आठवड्यात शरण यावे लागेल अथवा सर्वोच्च न्यायालयातच पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल. पाशेको हे गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा असून सध्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खाते आहे. याआधी प्रतापसिंह राणे सरकारमध्ये कृषीमंत्री असताना १५ जुलै २00६ रोजी पाशेको यांनी वीज अभियंता कपिल नाटेकर यांना कार्यालयात बोलावून थप्पड लगावली होती. या प्रकरणात तब्बल तीन वर्षे कोणतेही आरोपपत्र दाखल झाले नव्हते. आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी गोवा सरकारला कायदेशीर नोटीस बजावल्याने शेवटी त्यांच्यावर २00९ साली आरोपपत्र दाखल झाले होते. २0११ साली मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्याला कामावर असताना मारहाण केल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते.