शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भेटवस्तू देत त्याने केली पत्नीची 'विदाई'

By admin | Updated: August 7, 2015 16:28 IST

लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती समजल्यावर उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या फुलचंद नामक तरुणाने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि. ७ - लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती समजल्यावर उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या फुलचंद नामक तरुणाने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे. बॉलीवूडमधील चित्रपटातील कथानक शोभेल अशी ही घटना असली तरी प्रत्यक्षात पत्नीची विदाई करताना फुलचंदच्या चेह-यावरील भाव बघून सर्वांचेच डोळे पाणावले होते.
उत्तरप्रदेशमधील  बिकापूर या गावात राहणा-या चंदा नामक तरुणीचे २०१२ मध्ये फुलचंदशी लग्न झाले होते. फुलचंद हा पालीपूरब या गावाचा रहिवासी असून तो कामानिमित्त जालंधरला असतो.  चंदाचे लग्नापूर्वी तिच्याच गावात राहणा-या सुरजसोबत  प्रेमसंबंध होते. मात्र आईवडिलांच्या दबावापोटी तिने फुलचंदशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांनी फुलचंद जालंधरला निघून गेला. या प्रदीर्घ कालावधीत फुलचंदचे फोनवरुन पत्नी चंदाशी बोलणे होत होते. तर दुसरीकडे सुरजचे नातेवाईकही पालीपूरबमध्ये असल्याने यानिमित्त तोदेखील पालीपूरबला यायचा. सुरजचे नातेवाईक व चंदाचे सासर हे एकाच विभागात असल्याने लग्नानंतरही या दोघांमध्ये भेटीगाठी सुरुच होत्या. 
ऑगस्टमध्ये फुलचंद जालंधरवरुन गावी परतल्यावर चंदाने लग्नात दिलेले दागिने, भेटवस्तू या गोष्टी फुलचंदला परत केल्या व त्याच्यासमोर सुरजशी प्रेमसंबंध असल्याची कबुलीही दिली. पत्नीचे हे वाक्य ऐकून फुलचंद सुरुवातीला चिडला. त्याला दुःखही झाले. मात्र काही वेळाने सर्व शांत झाल्यावर फुलचंदने चंदा व सुरजचे लग्न लावून देण्याचा धाडसी निर्णय घेतला. आधी त्याने स्वतःच्या घरच्यांची व नंतर चंदाच्या माहेरच्या मंडळींना या घटनेची माहिती दिली. अखेरीस हे प्रकरण गावाच्या पंचायतीसमोर गेले. फुलचंदने पंचायत प्रमुखांना त्याचे म्हणणे पटवून दिले. चंदाच्या कुटुंबानेही या लग्नाला होकार दिला. शेवटी सुरजच्या कुटुंबाला विचारणा झाली व त्यांनीदेखील या लग्नाला होकार दिला. 
पालीपूरब येथील शिवमंदिरात नुकतंच सुरज व चंदाचे लग्न झाले. फुलचंदने लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांसाठी  जेवण तर ठेवलेच होते. याशिवाय फुलचंद व त्याच्या कुटुंबाने विदाईच्या वेळी चंदाला भेटवस्तूही दिल्या.