शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

योजनांना पंतप्रधान अथवा अन्य नेत्यांचे नाव देणार

By admin | Updated: April 25, 2016 03:51 IST

केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेला ‘पंतप्रधान’ अथवा अन्य राष्ट्रीय नेत्यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेला ‘पंतप्रधान’ अथवा अन्य राष्ट्रीय नेत्यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपटाचे प्रदर्शन करण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर सरकारने तयार केलेले माहितीपट प्रत्येक चित्रपटगृहात दाखविणे बंधनकारक केले जाऊ शकते.राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजना आणि कामगिरीबाबत माहिती देण्यासाठी उपाययोजना सुचविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मंत्री गटाने, केंद्रीय योजनांसोबत ‘पंतप्रधान’ व अन्य राष्ट्रवादी नेत्यांचे नाव जोडणे आणि सरकारच्या कामगिरीबाबत चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी माहितीपट दाखविणे सक्ती करण्याची शिफारस केली आहे.सांसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या या मंत्री गटाच्या बैठकीत वितरित करण्यात आलेल्या परिपत्रकात या शिफारशी करण्यात आल्या आहेत. भूतकाळात आणि वर्तमानात फरक दर्शविणारी आणि सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा असलेली अ‍ॅनिमेशन क्लिपदेखील तयार करण्यात आली पाहिजे, अशी आणखी एक शिफारस या गटाने केली आहे. मंत्री गटाच्या या शिफारशी अमलात आणण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाला सोबत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. दर दोन आठवड्यांत सरकारची कामगिरी सांगण्यासाठी एक माहितीपट तयार करण्याची शिफारस या मंत्री गटाने केली आहे. हा माहितीपट प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्याआधी दाखविणे अनिवार्य राहील.