शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

न्याय द्या; अथवा इच्छामरणाची परवानगी द्या

By admin | Updated: July 24, 2015 01:00 IST

मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) महाघोटाळ्याप्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेल्या ग्वाल्हेरच्या पाच विद्यार्थ्यांनी न्यायासाठी

भोपाळ : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) महाघोटाळ्याप्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेल्या ग्वाल्हेरच्या पाच विद्यार्थ्यांनी न्यायासाठी थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना साकडे घातले आहे. न्याय द्या; अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.हे पाचही जण ग्वाल्हेरच्या गजरा राजा वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मनीष शर्मा, राघवेंद्र सिंह, पंकज बन्सल, अमित चड्ढा आणि विकास गुप्ता, अशी त्यांची नावे आहेत. या पाचही जणांनी पीएमटी-२०१० परीक्षा उत्तीर्ण करून एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. सन २०१३ मध्ये या सर्वांना बेकायदेशीररीत्या पीएमटी परीक्षा उत्तीर्ण केल्याप्रकरणी आरोपी बनविण्यात आले होते. या पाचही जणांच्या पीएमटी प्रवेशपत्रावरील छायाचित्र आणि स्वाक्षरी महाविद्यालयाच्या ओळखपत्राशी जुळत नसल्याचे आढळल्यानंतर त्यांना आरोपी बनविण्यात आले होते. मात्र, सर्व फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट आणि अन्य चाचण्यांनंतर विशेष तपास दलाने या सर्वांना आरोपातून मुक्त केले होते. याउपरही महाविद्यालय व्यवस्थापनाकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जाते. जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केले जाते, असा आरोप या पाचही जणांनी केला आहे. हा छळ थांबावा आणि त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे.एफआयआर दाखल झाल्यानंतर महाविद्यालयाने या सर्वांना निलंबित केले होते. यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण सुरूठेवण्यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती.