शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडहल्ल्याच्या बळींना अपंग मानून सवलती द्या

By admin | Updated: December 8, 2015 01:33 IST

केंद्र आणि राज्य सरकारांनी अ‍ॅसिडहल्ल्यांना बळी पडलेल्या व्यक्तींना भरपाई देणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि मोफत उपचार यासह अपंग पुनर्वसन कायद्यानुसार इतर सवलती देण्याचा विचार करावा

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारांनी अ‍ॅसिडहल्ल्यांना बळी पडलेल्या व्यक्तींना भरपाई देणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि मोफत उपचार यासह अपंग पुनर्वसन कायद्यानुसार इतर सवलती देण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.अ‍ॅसिडहल्ल्याने विद्रूप झालेल्या बिहारमधील एका मुलीच्या याचिकेवर हे निर्देश देताना न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने असेही म्हटले की, अशा व्यक्तींना समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने आणि त्यांना अपंग मानून सवलती दिल्याने त्यांच्या पुनर्वसनास भरीव मदत होईल.याचिका केलेल्या अ‍ॅसिडहल्ल्याच्या बळीला १० लाख रुपये भरपाई व विद्रूपीकरण दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रियेसह सर्व वैद्यकीय उपचार मोफत पुरविण्याचा आदेश बिहार सरकारला देण्याखेरीज खंडपीठाने इतर राज्यांनीही अशा व्यक्तींना सर्वतोपरी मदत करावी, असे सांगितले.खासगी इस्पितळे अशा बाधित व्यक्तींना मोफत उपचार देत नाहीत, अशी तक्रार करत ‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेने बिहारमधील या अ‍ॅसिडहल्ला बळीचे प्रकरण न्यायालयापुढे आणले होते. अपंग व्यक्तींना समान संधी देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संसदेने केलेल्या १९९६च्या कायद्यात अपंगांना नोकरीत ३ टक्के आरक्षण ठेवण्याखेरीज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व सार्वजनिक ठिकाणी अपंगस्नेही अशा सोयीसुविधा पुरविण्याची तरतूद आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कोर्टाने पूर्वी दिलेले आदेश -न्यायालयाने याआधीही अ‍ॅसिडहल्ल्यांना बळी पडलेल्या व्यक्तींसाठी वेळोवेळी अनेक आदेश दिले आहेत. त्यातील काही असे-खासगी इस्पितळांसह सर्व इस्पितळांनी अशा व्यक्तींना औषधे व विद्रूपीकरण निवारण शस्त्रक्रियेसह सर्व वैद्यकीय उपचार मोफत पुरवावेत.अशा व्यक्तींना इस्पितळांत आणल्यावर त्यांच्यावर लगेच व सुयोग्य उपचार केले जातील यासाठी राज्य सरकारांनी खासगी इस्पितळांशी समन्वयाने योजना तयार करावी.इस्पितळांनी अशा व्यक्तींना त्या अ‍ॅसिडहल्ल्याची बळी असल्याचा दाखला द्यावा व या दाखल्याच्या आधारे भविष्यातही मोफत उपचार केले जावेत.लोकांना बाजारात अ‍ॅसिड सहजासहजी उपलब्ध होऊ नये यासाठी अ‍ॅसिडचा अनुसूचित वस्तूंच्या यादीत समावेश करून त्याच्या विक्रीचे नियंत्रण केले जावे.