शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

भाजपच्या हाती सत्ता द्या, तुम्हाला प्रशस्त रस्ते देईन

By admin | Updated: April 8, 2016 02:30 IST

‘काँग्रेस राजवटीत आसाममधे गेल्या ६0 वर्षांत जे घडले नाही ते भाजपचे सरकार पुढल्या पाच वर्षांत घडवून दाखवेल. भाजपच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या

सुरेश भटेवरा,  गुवाहाटी‘काँग्रेस राजवटीत आसाममधे गेल्या ६0 वर्षांत जे घडले नाही ते भाजपचे सरकार पुढल्या पाच वर्षांत घडवून दाखवेल. भाजपच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, तुम्हाला आसामचे भाग्य बदलणारे काँक्रीटचे प्रशस्त रस्ते मी देईन. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात लवकरच जलवाहतूक सुरू करेन. तरुणांसाठी राज्यात असंख्य नवे रोजगार सुरू होतील. केवळ निवडणुकीपुरती ही आश्वासने नाहीत तर केंद्र सरकारने आसाममधे हजारो कोटींच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभही केला आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय भूतल परिवहन व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी आसाममधील जाहीर सभांमध्ये केले.आसामच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी बरखेत्री (नलबारी), गोलपारा पूर्व आणि ढुबरी जिल्ह्यांतील बिलासीपारा मतदारसंघात उपस्थितांचे उजळलेले चेहरे गडकरींच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद देत होते. वेगाने काम करणारा मंत्री अशी प्रतिमा देशभर प्रस्थापित झाल्याने त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड उत्सुकतेने मोठा जनसमुदाय उपस्थित होता.प्रत्येक सभेत, शाळा, सरकारी दवाखाने आणि सार्वजनिक सेवांची दैन्यावस्था इत्यादी विषयांवरून गडकरींनी काँग्रेस राजवटीवर नर्मविनोदी शैलीत जोरदार प्रहार केले.