शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न द्यायला उशीरच - सी के बोस

By admin | Updated: August 10, 2014 18:41 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारत्न रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वृत्त समोर येत असतानाच नेताजींच्या नातेवाईकांनी याविषयी नाराजी दर्शवली आहे.

ऑनलाइन टीम

कोलकाता, दि. १० -  नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारत्न रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वृत्त समोर येत असतानाच नेताजींच्या नातेवाईकांनी याविषयी नाराजी दर्शवली आहे. नेताजींना भारतरत्न देण्यास उशीर झाला असून आता केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न देण्याऐवजी त्यांच्या बेपत्ता प्रकरणातील गोपनीय दस्तावेज उघड करावे अशी मागणी नेताजींच्या नातेवाईकांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह पाच जणांची भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान करायचा असेल तर त्यांनी नेताजींच्या बेपत्ता होण्याचे गुढ उकलावे. नेताजींच्या बेपत्ता होण्यासंदर्भातील सुमारे १०० गोपनीय फाईल्स केंद्र सरकारकडे पडून आहेत. ही सर्व कागदपत्र जनतेसाठी उघड करा आणि त्यामुळे सत्य सर्वांसमोर येईल. नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे गुढ उकलण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे अशी मागणीही त्यांनी केली. नेताजींना भारत रत्न पुरस्कार देण्यास उशीर झाला अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहेत. विश्व रत्न पुरस्कार असता तर तो नेताजींना मिळाला असता असे सुगाता बोस यांनी सांगितले.