शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना विषारी औषध पाजून मातेचा आत्महत्त्येचा प्रयत्न

By admin | Updated: May 25, 2016 23:56 IST

दिंडोरीतील घटना : दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू, आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

दिंडोरीतील घटना : दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू, आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरूनाशिक : वर्षभरापूर्वीच पतीचा मृत्यू झालेल्या विधवेने आपल्या अकरा महिन्यांच्या जुळ्या मुलींना विषारी औषध पाजून स्वत:ही आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास दिंडोरीतील कादवानगरमध्ये घडली़ यामध्ये या दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू झाला असून, मातेवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़दिंडोरीमधील कादवानगरमधील रहिवासी अनिता पगारे (३०) या महिलेचा पती प्रदीप पगारे याचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर अनिता मुुंबई सोडून आपल्या दोन्ही जुळ्या मुली शर्वरी व शलाका यांना घेऊन दिंडोरीला वडिलांकडे राहण्यासाठी आल्या़ बुधवारी सायंकाळच्या सुमारास अनिता पगारे यांनी दोन्ही मुली शर्वरी व शलाका यांना विषारी औषध पाजले व स्वत:ही प्राशन केले़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांची ही बाब लक्षात आली़ त्यांनी या तिघांनाही तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़दिंडारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जुळ्या मुलींमधील शर्वरीचा मृत्यू झाला़ तर दुसरी मुलगी शलाका व अनिता यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले़ या ठिकाणी शलाकाचा मृत्यू झाला, तर अनिता पगारे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ उच्चशिक्षित असलेल्या अनिता पगारे यांनी इतके कठोर पाऊल का उचलले याबाबत कुटुंबीय अनभिज्ञ आहेत़ या घटनेमुळे कादवानगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, या घटनेची दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)--इन्फो--पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता पगारे या पतीच्या मृत्यूनंतर कोलमडून गेल्या होत्या़ आपल्या दोन्ही जुळ्या मुलींचे पुढे कसे होणार याबाबत त्या सतत चिंतेत होत्या़ वडिलांकडे राहात असलेल्या अनिता पगारे या एमए बीएड अर्थात उच्चशिक्षित असल्याने त्या अशाप्रकारे पाऊल उचलतील अशी यत्किंचितही शंका त्यांच्या आई-वडिलांना नव्हती़