शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटींमध्ये मुलींच्या जागा वाढणार

By admin | Updated: April 16, 2017 00:20 IST

’इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे सध्याचे अत्यल्प प्रमाण वाढवून येत्या काही

नवी दिल्ली : ’इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे सध्याचे अत्यल्प प्रमाण वाढवून येत्या काही वर्षांत ते किमान २० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त जागा निर्माण करून त्यावर मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘आयआयटीं’मधील प्रवेशांसंबंधीचे धोरण ठरविणाऱ्या ‘जॉइंट अ‍ॅडमिशन बोर्डा’च्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार २०१८ पासून प्रत्येक आयआयटीचे प्रवेश देताना महिलांसाठी मंजूर प्रवेश क्षमतेहून जास्तीच्या जागा (सुपरन्युमेररी) तयार केल्या जातील. प्रवेश दिलेल्या मुलींचे प्रमाण एकूण प्रवेशांच्या २० टक्के होईपर्यंत दरवर्षी अशा जादा जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल. या बैठकीस हजर राहिलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या महिला उमेदवारांना त्यांच्या गुणांच्या टक्केवारीवर नियमित प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश मिळू शकणार नाही त्यांना वाढविलेल्या जागांवर प्रवेश दिले जातील. जास्तीत जास्त आठ वर्षे मुलींसाठी प्रवेशाच्या जागा वाढविल्या जातील. परिणामी मुलींचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे. आगामी वर्षात महिलांचे प्रवेश १४ टक्के होतील अशा प्रकारे जागा वाढवल्या जातील.एकूण २३ आयआयटी असून स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे तेथे प्रवेश मिळू शकणाऱ्या मुलींचे प्रमाण जेमतेम आठ टक्के आहे. जेईई आणि जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या आधारे प्रवेश दिले जातात. परीक्षेतील यशासाठी ठराविक शहरांतील कोचिंग क्लास लावले जातात. तेथे जाणारी बहुतांश विद्यार्थी परगावचे असतात व ते अनेक महिने क्लासच्या ठिकाणी वास्तव्य करतात. साहजिकच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व त्यांत प्रवेश मिळू शकेल एवढे यश मिळविणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असते. सन २०१५ मध्ये आयआयटींमधील एकूण १० हजार जागांपैकी जेमतेम एक हजार जागांवर महिला उमेदवार प्रवेश मिळवू शकल्या. गेल्या वर्षी हे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊन आठ टक्क्यांवर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुलांवर अन्याय होणार नाहीवाढीव जागा निर्माण करून त्यावर मुलींना प्रवेश देण्यात येणार असल्याने पुरुष उमेदवारांसाठी गुणवत्तेवर उपलब्ध होणाऱ्या जागांमध्ये कपात होणार नाही. - ज्या महिला उमेदवार जेईई अ‍ॅडव्हान्स्ड उत्तीर्ण आहेत, पण गुणवत्ता क्रमानुसार ज्यांना प्रवेश मिळू शकणार नाही, अशांनाच वाढीव जागांवर प्रवेश दिले जातील.