शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

By admin | Updated: February 21, 2016 00:59 IST

मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन

अलिगढ : मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांना गावचे रस्ते स्वच्छ करण्याची शिक्षा भोगावी लागेल, असेही जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला स्मार्टफोनद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असतानाच इगलस तालुक्यातील बसौली गावच्या पंचायतीने बंदीचा निर्णय घेतला, हे उल्लेखनीय. बसौली गावच्या खाप पंचायतीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, गावातील अविवाहित मुली मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर करणार नाहीत. मोबाईल वापरताना पकडले गेल्यास संबंधित मुलीच्या कुटुंबियांना गावातील पाचशे मीटरचा रस्ता सलग पाच दिवस स्वच्छ करावा लागेल किंवा मग एक हजार रुपये दंड होईल. (वृत्तसंस्था)मोबाईलच्या वापरामुळे मुलींचे मुलांशी संबंध निर्माण होऊन त्यांचे आयुष्य बरबाद होते. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही घडतो. आमच्या काळात अशा समस्या नव्हत्या; मात्र या तंत्रज्ञानामुळे मुलींच्या आयुष्याची हानी होत असून आम्हाला त्याला आळा घालायचा आहे, असे पंचायतीचे समन्वयक रामवीरसिंह यांनी सांगितले. मुली मोबाईल वापरतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.