आईने पापड लाटण्याचे सांगताच तरुणीने घेतला गळफास
By admin | Updated: February 7, 2016 00:57 IST
जळगाव: पापड लाटण्याच्या कारणावरून आईशी वाद घालून शुभांगी विठ्ठल कोळी (वय १६ रा.पाळधी, ता.धरणगाव) या तरुणीने संतापात घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता पाळधी गावातील खडकपुरा भागात घडली. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आईने पापड लाटण्याचे सांगताच तरुणीने घेतला गळफास
जळगाव: पापड लाटण्याच्या कारणावरून आईशी वाद घालून शुभांगी विठ्ठल कोळी (वय १६ रा.पाळधी, ता.धरणगाव) या तरुणीने संतापात घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता पाळधी गावातील खडकपुरा भागात घडली. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पाळधी गावातील खडकपुरा भागात राहणार्या विठ्ठल कोळी यांच्याकडे घरात पापड लाटण्याचे काम सुरू होते. आईने शुभांगीला पापड लाटण्याचे काम सांगितले, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या संतापात शुभांगीने घरात जाऊन गळफास लावून जीवनच संपविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आठ महिन्याच्या बालकाचा मृत्यूसर्दी, ताप व खोकल्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या पियूष दीपक बडगुजर (वय आठ महिने रा.पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) या बालकाचा शुक्रवारी रात्री दहा वाजता विश्व प्रभा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. संध्याकाळी सहा वाजता त्याला दाखल करण्यात आले होते. डॉ.राजेश पाटील यांच्या खबरीवरुन रामानंद नगर पोलीस स्टेशनला शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.