मुलीस पळविणारा अटकेत
By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST
जळगाव- शिरसोली प्र.न. येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी श्रावण रामकृष्ण मोरे (वय २२) रा.शिरसोली प्र.न. ता.जळगाव यास औद्योगिक वसाहत पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली.
मुलीस पळविणारा अटकेत
जळगाव- शिरसोली प्र.न. येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी श्रावण रामकृष्ण मोरे (वय २२) रा.शिरसोली प्र.न. ता.जळगाव यास औद्योगिक वसाहत पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. त्याच्यासोबत संबंधित अल्पवयीन युवतीही सापडली असून, तिलाही अटक करण्यात आली आहे. दुपारी पिंपळगाव थडीचे ता.भडगाव येथे दोघेही सापडले. मुलीचे वय १७ वर्षे तीन महिने आहे. तपास करीत असताना उपनिरीक्षक अशोक अहिरे, कर्मचारी किरण गायकवाड, दीपक चौधरी यांनी आरोपींना अटक केली. त्यांना औद्योगिक वसाहत पोेलिसात आणल्यानंतर त्यांचे नातेवाईक गोळा झाले.